बिमार आईला भेटण्यासाठी नेतो म्हणून आदिवासी मुलीवर अत्याचार

जगन्नाथ पुरी
डीएम रिपोर्ट्स/सेनगाव- तुझी आई आजारी आहे, तिला भेटण्यासाठी चल असे म्हणून मोटारसायकलवर बसविले आणि थेट हिंगोलीतील गायत्री नगरात आणून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनतेतील आरोपी हा सेनगाव तालुक्यातील लिंबाळा हुंडी येथील असून मुलगी ही जामदया येथील आहे.

सेनगाव जामदया येथील सदर १७ वर्षीय मुलगी एकटी असल्याचे पाहून तिला, आरोपी पंढरी पंडित थिटे (२८) म्हणाला की तुझी अचानक आजारी पडली. तिला पाहण्यासाठी लवकर चल असे म्हणून तिला मोटारसायकवलर बसविले आणि मोटारसायकल थेट हिंगोलीत आणली. हिंगोलीत आल्यावर गायत्री नगरात भाड्याचे खोलीत सदर मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. तसेच त्यांनतर पून्हा तिला लिंबाळा हुंडी येथील शिवारात नेवून त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्यात आले. ही घटना दिनांक १४ ते २१ जुलै दरम्यान घडली आहे. याबाबत कुणाला बोलली किंवा अत्याचार झाल्याचे सांगितले तर जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली. परंतु नंतर सदर मुलीने घरच्यांना याबाबत माहिती सांगितली. त्यानंतर देण्यात आलेल्या फिर्यादीवरून आज सेनगाव पोलीस ठाण्यात भादंवि आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या