या आंब्याला वर्षातून दोन वेळेस येतात आंबे; मराठवाड्यात बनला चर्चेचा विषय

सिकंदर पठाण
डीएम रिपोर्ट्स- बहुतांश म्हणजेच जवळजवळ सर्वच झाडांना वर्षांतून एकदाच आणि तेही उन्हाळ्यात आंबे आलेले आपण पाहतो. परंतु हिंगोली जिल्ह्यात असेही एक झाड आहे त्याला वर्षातून दोन वेळा आंबे येतात. फळांच्या या राजाची मोठीच कीर्ती असून दर पावसाळयात त्याला पाहण्यासाठी आणि पावसाळ्यात आलेले आंबे खाण्यासाठी परिसरातील लोक येत असतात. 
जिल्ह्यातील असे एक गाव आहे, त्या गावाला आज दोनदा आंबे येणारे गाव का? या नावाने ओळखले जाते. त्या गावाचे नाव आहे कहाकर बुद्रुक. या गावातील शेतकरी संतोष पोपळघट यांच्या शेतामध्ये चक्क वर्षांमध्ये दोनदा येणारे आंब्याचे झाड असून या आंब्याच्या झाडाला वर्षातुन दोनदा बहार येतो व लदबदून आंब्याचे फळ सुद्धा लागतात. कुठल्याही प्रकारची कृत्रिम लावणी नसून एक नैसर्गिकरित्या हे झाड पोपळघट यांची आजी मंगलाबाई यांनी लावलेले आहे. झाड अक्षरश: आजही १० वर्षानंतर फळ देत आहे. हे शेंदरी रंगाचे फळ असून या आंब्याच्या झाडाला परिसरातील लोक सदाफळे या टोपणनावाने ओळखले जाते. हे फळ खाण्यास आंबट गोड असून अस्सल गावरान आहे. त्यामुळे हे झाड संकरित असण्याची शक्यता नाही. हिंगोली जिल्ह्यात अशाच प्रकारचे दुसरे झाड आढळून येत नाही. त्यामुळे या झाडाचे बीज बाहेर जिल्ह्यतू आले असावे असा अंदाज आहे. असे असले तरी हिंगोली जिल्ह्याशेजारील विदर्भ आणि मराठवाड्यातील आठ-दहा जिल्ह्यांमध्ये तरी या प्रकारचे दोन वेळेस फळ येणारे आंब्याचे झाड दिसून येत नाही. पोपळघट यांच्या आजीने लावलेल्या या झाडाचे बीज नेमके कुठून आले, याची काहीही माहिती नाही. त्यामुळे या झाडावर संशोधन होणे गरजेचे आहे.

"कृषि विभागाने संशोधन करावे"
याबाबत संतोष पोपळघट यांनी या झाडाविषयी सांगितले, की हे दोनदा देणारे झाड जवळपास विदर्भात किंवा मराठवाड्यात मी तर पहिले नाहीच. शिवाय माझ्या शेतातील हे नैसर्गिक आंब्याचा फळ संशोधन होऊन इतरत्र शेतकऱ्यांनी या झाडाचे बी लावावे जेणेकरून त्यांनाही जास्तीत जास्त उत्पादन करता येईल. यासाठी कृषी संशोधन होणे गरजेचे असून कृषी विभागाने याकडे लक्ष द्यावे व या फळात नेमकं काय वेगळेपण आहे याचा शोध लावून त्याचा प्रसार, प्रचार करावा. जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर हा आंबा गेला पाहिजे आणि त्यासाठी आपण कृषी विभागाला या झाडावर संशोधन करू देण्यास आजही तयार आहे.- संतोष पोपळघट, शेतकरी.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने