डीएम रिपोर्ट्स/हिंगोली- काँग्रेस आघाडी-शिवसेनेच्या राज्यात राज्यभरात बौद्ध, अनुशासित जाती, जमाती समूहांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार वाढले राज्य सरकारचा निषेध करून रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) ऑफ इंडियाच्या वतीने पालकमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनानुसार, राज्यभरात बौद्ध, दलित आणि मागास समाजावर जातीवादी मानसिकतेच्या लोकांकडून अत्याचार वाढले आहेत. विशेषतः हिंगोली जिल्ह्यातही अत्याचारांमध्ये वाढ झाली असून सत्ताधारी पक्षांचे लोकच हा अन्याय करीत आहेत. या प्रकाराला अटकाव घालण्यात राज्यशासन सपशेल फेल ठरले असल्याने निवेदनकर्त्यांनी राज्यशासनाचा निषेध केला. तसेच जातीय अत्याचार कमी करण्यासाठी अनुसूचित जातीी जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करण्यात याव आणि गुन्हेगारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे याबाबत पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध सुद्धा करण्यात आला त्याच बरोबर हिंगोली येथील शासकीय विश्रामग्रह समूह पालकमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन देऊन त्या ठिकाणीी सुद्धा निषेध करण्यात आला. या निषेध आंदोलनात पार्टीचे प्रदेश सचिव दिवाकर माने, आयटी सेलचे प्रमुख सुरेश वाढे, युवक जिल्हाध्यक्ष मिलिंद कवाने, सुभाष ठोके, सुनील इंगोले, रमेश इंगोले, प्रकाश कुऱ्हे, सुभाष कांबळे आदी सहभागी झाले होते.