कोरोना काळातही राज्यात विक्रमी कापूस खरेदी

बिभीषण जोशी
डीएम रिपोर्ट्स/हिंगोली-  राज्यात कोरोना सारखी आपत्तीची परिस्थिती असतांना देखील पणन विभागामार्फत राज्यात विक्रमी सुमारे २१९.५९ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून हिंगोली जिल्ह्यातही मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी दूप्पटीने कापूस खरेदी झाली असल्याची माहिती पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी  दिली आहे.
राज्यात मागील दहा वर्षात झाली नाही अशी विक्रमी कापूस खरेदी झाली आहे. या खरेदीचे एकूण मुल्य ११,७७६.८९ कोटी रुपये असून आतापर्यात ११,०२८९.४७   कोटी रक्कम शेतकऱ्यांना अदा देखील करण्यात आली आहे. तसेच सीसीआयने ३० सप्टेंबर पर्यंत एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी करणार असल्याचे घोषीत केले आहे.

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाच्या आपत्तीजन्य कालावधीत काही दिवस खरेदी बंद होती. परंतु नंतर खरेदी सुरू करण्यात आली व आगाऊ नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी करण्यात आला.  जिल्ह्यात यावर्षी एक हजार ८०४ शेतकरी बांधवांनी आपली नोंदणी केली होती. अद्यापपर्यंत जिल्ह्यात १७ हजार ९६० शेतकरी बांधवांचा चार लाख वीस हजार ८५२.५५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. यामध्ये कापूस पणन महासंघामार्फत २ हजार ७१३ शेतकऱ्यांची ५६ हजार ३७० क्विटंल तर सी.सी.आय. मार्फत ९ हजार ८२६ शेतकऱ्यांची २ लाख ६७ हजार ८७०.४५ क्विंटल, खाजगी बाजार मार्फत २ हजार ३६७ शेतकऱ्यांची ४९ हजार ७४२.१० क्विंटल तर बाजार समितीतील अनुज्ञाप्तीधारक व्यापाऱ्यामार्फत ३ हजार ०५५ शेतकऱ्यांची ४६ हजार ८७० क्विंटल अशी एकुण १७ हजार ९६० शेतकरी बांधवांचा ४ लाख २० हजार ८५२.५५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असल्याचे उपनिबंधक सुधीर मैत्रेवार यांनी सांगितले.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने