नेपाळने घातली भारतीय खाजगी मीडियावर बंदी Nepal Imposed A Ban On All Private Indian News Channels

Nepal bans private Indian news channels except Doordarshan, दूरदर्शन वगळून सर्व खाजगी न्यूज चॅनलला बंदी

डीएम रिपोर्ट्स- भारताने गेल्या आठवड्यात चिनी बनावटीच्या ५९ मोबाईल ऍप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर बुधवारी भारतीय लष्कराने भारताने बंदी घातलेल्या ५९ मोबाईल ऍप्ससह ८९ ऍप्स सैनिकांना त्यांच्या मोबाईलमधून उडविण्याचे आदेश दिले. तर अमेरिकाही चिनी ऍपवर बंदी घालणार असल्याच्या बातम्या असतानाच आता या बंदी युद्धात आता भारताचा शेजारी नेपाळमधील केबल ऑपरेटरनी सुद्धा प्रवेश केला असून या देशाने भारताचे न्यूज चॅनल गुरुवारी (९ जुलै) बंद केले आहेत. भारताची अधिकृत भूमिका आणि सरकारी माहिती तेवढी समजण्यासाठी फक्त सरकारी बातम्यांचे चॅनल दूरदर्शनला त्यांच्या देशात चालू देण्यात येणार आहेत.
भारतातील मीडियाने नेपाळची चुकीची प्रतिमा निर्माण केली असल्याचा आरोप या केबल ऑपरेटरांचा आहे. याबाबत नेपाळच्या मल्टी- सिस्टीम ऑपरेटर्सने आता भारताचे केवळ दूरदर्शन हे एकमेव चॅनल दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. तर ही बंदी घालण्यापूर्वीच नेपाळचे माहिती आणि प्रसारण मंत्री युबराज खातीवाडा, यांनी पत्रकारांना सांगितले, की भारतातील मीडियाने आंतरराष्ट्रीय पातळीवर नेपाळची प्रतिमा मलीन केली आहे असून नेपाळचे सार्वभौमत्व आणि सन्मानावर हल्ला चढविला आहे. यावर आम्ही राजकीय आणि कायदेशीर उपाय शोधून काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. Yubaraj Khatiwada, Nepal's Information and Broadcasting Minister, during a press interaction said, "Nepal may seek political and legal remedies and also mobilise diplomatic channels against reports of Indian media attacking Nepal's sovereignty and dignity."

नेपाळने याबाबत कोणतेही अधिकृत प्रसिद्धीपत्रक काढले नाही किंवा कोणतीही घोषणा केली नाही. (But the Nepal Govt. has not issued any official order in this regard today) परंतु माहिती व प्रसारण मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनेनंतर लगेचच भारतातील खाजगी बातम्यांच्या चॅनलला बंदी घालण्यात आल्याने, या बंदीमागे नेपाळी सरकारचे पूर्णपणे पाठबळ असल्याचे बोलले जात आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने