मिडीयाला आर्थिक पॅकेज द्या, खासदार सय्यद इम्तियाज जलील यांची मागणी Package Be Given To Media- MP Imtiyaj Jalil

कोणत्याही कर्मचार्‍यांना कामावरून काढु नये; सरकारी जाहिरातींचे दर वाढवावे

डीएम रिपोर्ट्स/औरंगाबाद- खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी देशभरात कोरोना या महाभयंकर परिस्थिती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र कोविड-19 सारख्या संसर्गजन्य विषाणू पासून सर्वसामान्य लोकांना जागृत करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियातील सर्व कर्मचाऱ्यांना व मीडिया क्षेत्राला तात्काळ आर्थिक पॅकेज घोषित करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रात पुढे नमूद केले की, दोन दशकांहून अधिक काळ मी स्वत: पत्रकार असल्यामुळे जेव्हा पासून मला कळाले की कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्रे आणि वृत्तचित्र वाहिनी संस्थांकडून मोठ्या संख्येने त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात येत आहे तसेच देशभरातील हजारो पत्रकार आणि मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्याना अशा कठीण परिस्थितीत बडतर्फ करण्यात आल्याचे कळाल्याने मला अतिशय दुःख वाटत आहे.

Package Be Given To Media, Demands MP Imtiyaj Jalil

Aurangabad MP Syed Imtiaz Jalil has demanded economical package to get relief for all employees of the print and electronic media and media sector, the fourth pillar of democracy, which is working day and night to awaken the general public from the contagious virus Covid-19. He has written a letter to Prime Minister Narendra Modi in this regard. MP Imtiaz Jalil further stated in the letter that since he has been a journalist for more than two decades, he has come to know that in the wake of the Covid-19 crisis, a large number of their employees including the journalists and non-journalists are being driven out by newspapers and news channels across the country. He said in the letter to PM, "I am deeply saddened to learn that the media employees in such a difficult situation were fired out".

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या