बौद्ध समाजावर वाढत्या अन्याय-अत्याचार बाबत पालकमंत्र्यांना निवेदन

डीएम रिपोर्ट्स-  जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांना राष्ट्रीय मानव विकास फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यासह राज्यभरात बौद्ध समाजावर सामूहिक हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे जाणीवपूर्वक व्यक्तिशः कारणावरून मागील कुरापती उकरून बौद्ध समाजाला टार्गेट केल्या जात आहे. बौद्ध वस्त्यांमध्ये घुसून महिलांना वयस्क नागरिकांना तरुणांवर लाठ्या काठ्या तलवारी घेऊन हल्ला करण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढत आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील समाजामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिडीत कुटुंबीय पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी गेल्यास त्यांना हवे ते सहकार्य मिळत नाही घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने गुन्हे दाखल केल्या जात नाही उलट राजकीय दबाव तंत्राला बळी पडून पीडितांवर  दबाव गट तयार करून पिडीत कुटुंबियांवरच चोरी,दरोडा, विनयभंग, छेडछाड, रॉबरी सारखे गुन्हे दाखल केले जात आहेत. ज्या ज्या ठिकाणी  अट्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत त्या त्या ठिकाणी पर्याय म्हणून पिडीतांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्या जात आहेत. आपल्या सरकारच्या काळात अश्या घटना घडणुये या साठी ग्रामीण व शहरी भागात प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता समिती व जिल्हा दक्षता समिती मार्फत दर सहा महिन्याला बैठका घेऊन समाजा मध्ये बंधू भावाचे नाते निर्माण करण्याचे काम करावे या विषयी जिल्हा प्रशासनाला आदेश देण्यात यावे तसेच मागासवर्गीय समाजावर सामूहिक हल्ले करणाऱ्यावर अट्रोसिटी कायद्याच्या कलमासह मोका कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची दरतुद करण्यात करावी. लॉकडाऊनच्या आडून बौद्ध समाजाला टार्गेट होत असलेला अन्याय अत्याचार थांबवावा अन्यथा राज्यभर जन आंदोलन उभारू अश्या मागण्याचे निवेदन राष्ट्रीय मानव विकास फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद खरे, राजरत्न भालेराव सचिन इंगोले यांच्या वतीने देण्यात आले.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने