प्रभू राम भारतीय नाही, तर नेपाळी, नेपाळच्या प्रधानमंत्र्यांचा दावा

डीएम रिपोर्ट्स- नेपाळचे प्रधानमंत्री के. पी. शर्मा यांनी भारतात हिंदू धर्मीयांसाठी आराध्य दैवत असलेले प्रभू राम हे भारतीय नसून नेपाळी वंशाचे असल्याचे आज नमूद केले असून, प्रधान मंत्र्यांच्या या वक्त्यामुळे प्रभू राम भारतीय नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.
याबाबत नेपाळच्या मीडियाने नेपाळचे प्रधानमंत्री के.पी. शर्मा यांच्या वक्तव्याला ठळक प्रसिद्धी दिली आहे. शर्मा म्हणाले की, भारतीय लोक ज्या अयोध्येला भारतात दाखवीत आहेत, ती अयोध्या भारतात नसून नेपाळमध्ये आहे. "खरी अयोध्या नेपाळमध्ये आहे" या शब्दांमध्ये प्रधानमंत्री शर्मा प्रभू राम यांची अयोध्या भारतात नसून नेपाळमध्ये असल्याचे नमूद केले आहे. याबाबत प्रसिद्ध एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. शर्मा यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर टीका होत असली, तरी  अयोध्या येथे चालू असलेल्या राम मंदिराच्या कामाच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य महत्वपूर्ण मानले जात आहे. अयोध्येत चालू असलेल्या प्रभू राम मंदिरासाठीच्या खोदकामात रामाच्या जन्माचा किंवा राम हे भारताचे राजे होते याबाबत कोणताही पुरावा आढळला नाही. तर उलट त्याठिकाणी बौद्धकालीन साकेत नगरीचे पुरावे सापडले सापडले आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयात झालेल्या अंतिम सुनावणीत राम मंदिर  आणि बाबरी मशीद प्रकरणावर दिवाणी न्यायालयाप्रमाणे निकाल न देता, हिंदूंना खुश करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समाधान करण्यासाठी निकाल देण्यात आला असल्याचा आरोप एआयएम पक्षाचे अध्यक्ष असासुद्दीन ओवेसी यांनी  केला होता. त्यांच्या मतानुसार, न्यायालयाचा निकाल हा ऐतिहासिक पुराव्यांवर न देता, एक दिवाणी तोडगा (जो कुणीही मागितला नव्हता) म्हणून देण्यात आला आहे.
या सर्व बाबींचा विचार करता नेपाळचे प्रधानमंत्री के.पी. शर्मा यांच्या मताला मोठे महत्व निर्माण झाले आहे. अयोध्यामधील बाबरी मशीद राम मंदिरावर बांधण्यात आली नाही, हे न्यायालायत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे याबाबाबतीत भारतातील मुस्लिमांवर अन्याय झाला असल्याची भावना आहेच; शिवाय अयोध्येत राम मंदिर नव्हते तर त्याठिकाणी बौद्ध मंदिरे होती या दाव्याला पुष्टी मिळत आहे.  


The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने