३१ जुलैपर्यंत अनुदानाचा प्रश्न निकाली न निघाल्यास आंदोलन- प्रा. आशिष इंगळे

डीएम रिपोर्ट्स- गेली कित्येक वर्षांपासून अनुदानासाठी चाललेला लढ्याला न्याय मिळत नसल्याने. राज्यातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक बांधव यांच्या सहनशीलतेचा अंत संपून हे सर्व शिक्षक, प्राध्यापक बांधव आता पुढील आठवड्यात पात्र घोषित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय यांना अनुदान वितरणाचा शासन निर्णय काढण्यात आला नाही, आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. आशिष इंगळे यांनी दिली.

याबाबत देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, हिंगोली जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्र राज्यात प्राध्यापक बांधव हे रस्त्यावर उतरून शासनाच्या विरोधात आक्रमक आंदोलन करणार आहेत. आतापर्यंत नुसते आश्वासन मिळाले असून शासनाने कोरोनाचे कारण सांगत प्राध्यापकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. आतापर्यंत महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटनेच्या वतीने लाखो निवेदन मेलद्वारे हे शिक्षण मंत्री, अर्थमंत्री, आणि मुख्यमंत्री यांना दिले गेले. पण याची दखल कुठल्याही खात्याने घेतली नाही. त्यामुळे विनाअनुदानित प्राध्यापक बांधव आता हतबल झाला आहे. शासनाने इतर विभागांना निधी मंजूर करत असून फक्त या शिक्षक वर्गाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने राज्यातील तमाम शिक्षक, प्राध्यापक बांधवांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. महाविकास आघाडी सरकारने दिलेले आश्वासन हे कागदावरच राहिले आहेत. तेव्हा यासाठी शिक्षक आमदार सुद्धा जबाबदार आहेत. तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार करून शासनाने लवकरात लवकर अनुदान संदर्भात निर्णय घेऊन पात्र कनिष्ठ महाविद्यालय यांना प्रचलित नियमानुसार अनुदान वितरणाचा शासन निर्णय तात्काळ काढावा. त्याचबरोबर अघोषित शाळा, महाविद्यालय घोषित करून अनुदान द्यावे आणि पगारासाठी लादलेली बिंदू नामावलीची तपासणी रद्द करावी, आणि या विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय यातील प्राध्यापक बांधवाना न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटनेच्या वतीने ई-मेलद्वारे शासनाकडे केली आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर संघटनेच्या वतीने हिंगोली जिल्ह्यासह राज्यभरातील शिक्षक, प्राध्यापक बांधव रस्त्यावर उतरवून आंदोलन करतील असा इशारा, महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटनेचे दिला असून हिंगोली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, सर्व प्राध्यापक बांधव, महिला भगिनी आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती प्रा. आशिष इंगळे यांनी दिली आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने