कोरोना: रूग्ण बरे होण्यात हिंगोली जिल्ह्याचा राज्यात उच्चांक

डीएम रिपोर्ट्स- हिंगोली जिल्ह्याने कोरोना रुग्ण बरे होण्यात राज्यात उच्चांक स्थापिला असून जिल्ह्याचा रिकव्हरी रेट तब्बल ९२.५९ टक्के एवढा आहे. तर २० दिवसांपूर्वी तिसऱ्या क्रमांकावर असलेला जिल्हा पहिल्या क्रमांकावर गेल्याने याचे श्रेय आरोग्य यंत्रणेला द्यावेच लागेल.

जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नामुळे कोरोना जिल्ह्याला हे यश मिळाले असून जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, पोलीस अधिक्षक योगेश कुमार, जिल्हा शल्यचिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार व प्रशासनातील सर्वच अधिकारी कर्मचारी यांनी योग्य ती खबरदारी घेऊन कोरोना रोखण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केल्याने हिंगोलीत कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण संख्या घटली आहे. जिल्ह्यात एकूण २९७ कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून त्यापैकी २५२ रूग्ण बरे झाले आहेत. आजघडीला ४५ कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू असून कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट ३ जुलै रोजी ९२.५९ एवढा होता. ४ जुलै रोजी ८६. ८१, तर ५ जुलै रोजी ८५. ३० टक्के एवढा होता. तर मृत्यू दर केवळ ०.३ टक्के एवढा आहे. या आकडेवारीवरून आरोग्य सेवा संचालनालय पुणे यांनी हिंगोली जिल्हा प्रथम असल्यासाचे नमूद केले आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १ हजार ८ आशा स्वयंसेविका, ३७ गटप्रवर्तक, १ हजार २१४ अंगणवाडी कार्यकर्त्या, ५०३ आरोग्य कर्मचारी, ११९ समुदाय आरोग्य अधिकारी, ६४ वैद्यकीय आरोग्य अधिकारी व ५ तालुका आरोग्य अधिकारी असे मनुष्यबळ आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या