विकास दुबेच्या सहा सदस्यांना आठवडाभरात यमसदनी पाठवले....
डीएम रिपोर्ट्स- सामान्य माणूस ते मंत्र्याचा खून दरोडा जमिनी बळकावणे आधी साठ गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला नागपूर जिल्ह्यातील गॅंगस्टर विकास दुबे याला मध्य प्रदेशात अटक केल्यानंतर आज सकाळी साडेआठ वाजता स्पेशल टास्क फोर्सच्या जवानांनी कानपूर महामार्गावर झालेल्या एन्काऊंटर मध्ये गोळ्या घालून ठार केले. विकास दुबेच्या एन्काऊंटरने कानपूरमधलं ३० वर्षांचं दहशतीच वातावरण संपल आहे.
कानपूर पोलीस महानिरीक्षकांनी विकास दुबे याचा खात्मा झाले असल्याचे जाहीर केले आहे. आज सकाळी ८.३० चे सुमारास पोलिस चकमकीत विकास दुबेचा अंत झाला आहे. विकास दुबेवर एका मंत्र्याच्या खुनाचा आरोप करून या आरोपाखाली त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्याने गनिमी काव्याने हल्ला करून त्यात आठ पोलिसांना ठार मारण्यात आले होते. पोलिसांनी विकास गँगमधल्या ६ जणांना गेल्या आठवड्यात यमसदनी पाठवले आहे. काजू बयाला मध्यप्रदेशातील अटक करून उत्तर प्रदेशातील कानपूर येथे घेऊन येत असताना कानपूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांची गाडी खराब झाली आणि गाडी रस्त्यावर थांबताच प्रभातने पिस्तूल हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरात त्याला गोळ्या घालून ठार केले.
विकास दुबेचा आणखी एक साथीदार प्रभात मिश्रा याला सुद्धा पोलिसांनी ठार केले. तसेच हमीरपुरच्या मौधा कोतवाली भागात विकास दुबेचा धारदार नेमबाज अमर दुबे याला पोलिसांनी ठार केले. बुधवारी ही चकमक झाली. अमर दुबे हमीरपूर येथील आपल्या नातेवाईकाच्या घरी लपण्यासाठी आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्या परिसराला घेरले आणि त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र, याच काळात अमरने पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला गोळ्या घालून ठार केले. तसेच रणवीर उर्फ बाऊ दुबे पोलिसांशी झालेल्या चकमकी दरम्यान मारला गेला. या चकमकीत विकास दुबेचा खास माणूस अतुल दुबेही ठार झाला. अतुल हा नातेसंबंधातील विकासचा चुलत भाऊ होता आणि तो बिकरु गावात राहत होता. अतुल दुबे यांचा मुलगाही पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असल्याचे सांगितले जाते.
तसेच ३ जुलै रोजी सकाळी कानपूर येथे झालेल्या चकमकीत विकास दुबेचा मामा प्रेम प्रकाश याला पोलिसांनी ठार केले. प्रेम प्रकाशच्या आणि त्याचा मृतदेह घेण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
तेलंगण पोलिसांनी केले होते चौकाचे एन्काऊंटर
हैदराबाद येथे पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवरील बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या २० ते २५ वयोगटातील ४ आरोपींना चौकशीसाठी घेऊन जात असताना तेलंगण पोलिसांनी हे आरोपी पळून जात असल्याचे दावा करून त्यांचे एन्काऊंटर करून सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गोळ्या घालून त्यांना ठार केले होते. ६ डिसेंबर २०१९ रोजी घडली होती. २९ नोव्हेंबर २०१९ रोजी तेलंगण पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर त्यांना घटनास्थळावरील चौकशीसाठी घेऊन जात असताना त्यांनी पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता आणि पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांना गोळ्या घालून जागीच ठार केले. या घटनेनंतर पोलिसांनी कायदा हातात घेऊन स्वतः न्यायनिवाडा करण्याचा प्रयत्न आरोपींना केल्याबद्दल देशभरातून पोलिसांवर टीकाही होत होती तसेच पोलिसांनी केलेल्या कृत्याचे अनेकांनी असमर्थ सुद्धा केले होते.