अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी

आमदार तानाजी मुटकुळे यांची पंतप्रधानांकडे मागणी

डीएम रिपोर्ट्स
सेनगाव/बबन सुतार- लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे हे दलित शोषित कष्टकरी कामगारांची नेते म्हणून त्याची ओळख आहे त्यांच्या लेखणीने अनेक कष्टकरी गिरणी कामगार यांच्या ज्वालंत प्रश्नावर यांचे लिखाण आहे या थोर महापुरुष लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष म्हणून संपूर्ण राज्यात साजरे केले जाणार आहे त्या अनुषंगाने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कार सन्मानित करून यांचे हे जन्मशताब्दी वर्ष साजरे करावे अशी मागणी हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्या लेखी पत्राद्वारे केली आहे.

अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असून त्यांचा जन्म(१ ऑगस्ट १९२० तर मृत्यू १८ जुलै १९६९ मुंबई येथे झाला आहे. तुकाराम साठे ना अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जात होते ते एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एका मांग (दलित) समाजामध्ये जन्मलेले व्यक्ती होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेत पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या त्यामध्ये 1959 मध्ये फकीरा नावाची कादंबरी 1961 मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला होता त्यांनी पंधरा लघुकथा संग्रह 12 पटकथा 10 पोवाडे रशियातील प्रवास असे अनेक लिखाण त्यांनी 27 भारतीय भाषेमध्ये प्रकाशित केले होते अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या पोवाडे व लावणीच्या लोककथा आपल्या ग्रामीण शैलीचा वापर करून त्या लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय बनल्या होत्या त्यांनी लिखित फकीरा कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली होती या फकीरा मध्ये त्यांनी वास्तववादी समुदायाला भूकमारी पासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढीवादी ्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणार्‍या नायक म्हणजे फकीरा चित्रित केला होता या फकीरा ब्रिटिश सरकारला विरोध केल्याने त्याला अटक करून त्यांचा छळ करण्यात आला होता व शेवटी त्यां फकीरा फाशी दोन ठार मारले होते अशा या वास्तववादी साहित्यिक प्रबोधनकार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष म्हणून संपूर्ण राज्यात साजरे होणार असल्याने राज्यातील बहुतांश मंत्री खासदार आमदार नगरसेवक या सर्व राजकीय पुढाऱ्यांनी अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च उपाधीने सन्मानित करण्याची मागणी एक मुखाने महाराष्ट्र शासनाकडे व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे त्यामध्ये राज्यशासनाने अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी ठराव पारित करावा व तो ठराव देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवण्यात यावा अशी शिफारस पत्रे देण्यात येत आहे त्या अनुषंगाने हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी आपल्या लेटरपॅडवर थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देऊन त्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष साजरे करावे अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे आमदार मुटकुळे यांनी केलेल्या मागणीचे सर्व अण्णाभाऊ साठे अनुयायांकडून स्वागत केले जात आहे त्यामध्ये चंद्रकांत अवचार यशोदा ताई कोरडे राधिकाताई चिंचोलीकर माजी नगराध्यक्ष बबन शिखरे भारत बळवंते रविकुमार वाघमारे पत्रकार बबन सुतार भागवत डोंगरे प्रकाश जोगदंड एड मधुकर कांबळे एड रणबावळे प्रदीप खंदारे आश्रुबा खंदारे रेपेकर शिवाजी सुतार गजानन कांबळे अशोक आवारे विलास सुतार भैया जाधव गणेश कांबळे शिवराज कांबळे हनुमान सुतार कृष्णा सुतार यासह समस्त जिल्ह्यातील मातंग समाजाकडून आम्ही अभिनंदन केल्या जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या