डी.एड., बी.एड. धारकांचे "घर बैठे डिग्री जलाओ आंदोलन "

डीएम रिपोर्ट्स/सेनगाव- शिक्षक भरती, शिक्षण सेवकांचे मानधन वाढ याबाबतीत राज्य शासन शिक्षणशास्त्र पदवी आणि पदविका धारकांनी १० जुलै रोजीपासून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनांतर्गत डि.टी.एड, बी.एड स्टूडंट असोसिएशनच्या वतीने 'घर बैठे डिग्री जलाओ' आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत संघटनेच्या वतीने नुकतेच प्रसिद्ध पत्रक देण्यात आले आहे.
जिल्हाध्यक्ष प्रकाश ठोके
डि.टी.एड, बी.एड स्टूडंट असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार, शिक्षक भरती बाबत सरकारच्या दुर्लक्ष आणि अन्यायकारक धोरणाचा निःशेष करण्यासाठी १० जुलै रोजी सकाळी १० वाजेपासून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. डीटीएड, बीएड स्टुडंट्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ठोके यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आंदोलन पुढील मागण्यांसाठी करण्यात येणार आहे. राज्यातील रखडलेल्या शिक्षक भरतीला विशेष परवानगी देऊन जागा भरण्यात याव्यात, शिक्षण सेवक यांच्या मानधनात वाढ करुण २४,००० रू करण्यात यावे, ५०% मागासवर्गीय पदभरती मधील कपात रद्द करावी, बी.एम.सी. मधील अपात्र ठरलेल्या उमेदवारांना न्याय देण्यात यावा.

या मागण्या पूर्ण करण्यासाठी या आंदोलनात डी.एड, बी.एड.धारक व शिक्षण सेवक घरी बसून सहभागी होणार असून पदवी (डिग्री) च्या प्रतिकात्मक प्रती (झेराॅक्स) जाळून ते विडीओ, फोटो सोशल मेडियावर शिक्षणमंत्री, आयुक्त आदींना पाठविण्यात येणार आहेत. शिक्षकांवर होणारा अन्याय दूर करून आमच्या मागण्या पूर्ण करून न्याय द्यावा असे आवाहन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व राज्यस्तरावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर हे करणार असून जिल्हास्तरावर त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जिल्ह्यातील पदवी आणि पदविका धारकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करून नेतृत्व करणार आहेत. जास्तीत जास्त डीएड, बीएड, शिक्षणसेवकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन हिंगोली जिल्हाध्यक्ष प्रकाश ठोके यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या