कोरोना: हिंगोली तालुक्यातील पेडगाव १४ दिवसांसाठी 'रेड झोन'

बिभीषण जोशी 
डीएम रिपोर्ट्स/हिंगोली- तालुक्यातील पेडगाव येथे दोन दिवसांपूर्वी मुंबईवरून परतलेला एक कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आल्याने त्याचा संसर्ग गावात व परिसरात फैलावू नये म्हणून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पेडगाव येथील सर्व सीमा गुरुवारी बंद करण्याचे आदेश काढले आहेत. तसेच १४ दिवसासाठी हा परिसर रेडझोन घोषित केला असल्याने गावातील नागरिकांना बाहेर येता येणार नाही तर बाहेरील नागरिकांना या काळात प्रवेश करता येणार नाही.
बुधवारी जिल्ह्यात एकाच दिवशी १४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद या हॉटस्पॉट झोन मधून अनेक मजूर आपल्या गावी परतत आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट कमी असतानाही बाहेरून येणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे वाढत आहे.

हे ही वाचा___ नेपाळने घातली भारतीय खाजगी मीडियावर बंदी Nepal Bans Private Indian News Channel

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबीनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. शिवाजी पवार, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, अतिरिक्त सीईओ डॉ. मिलिंद पोहरे, तलाठी अयुब पठाण आदींनी पेडगाव येथे भेट देऊन सीमा सील केल्या आहेत. या व्यक्तीच्या संपर्कात कोणी आले का? याची माहिती घेऊन त्या लोकांनाही क्वारंटाईन करण्यात येत आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने