राजगृहावरील हल्ल्याचा हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र निषेध, रिपब्लिकन सेनेचे अर्धनग्न आंदोलन

डीएम रिपोर्ट्स- मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवस्थानावर झालेल्या हल्ल्याचा जिल्हाभरात सर्वत्र निषेध करण्यात आला असून या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणीही अनेकांनी केली आहे. हिंगोलीसह सेनगाव, औंढा नागनाथ, कळमनुरी, वसमत अशा सर्वच ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात आला असून याबाबत जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
औंढा नागनाथ येथे रिपब्लिकन सेनेच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करून निषेध (छाया- दत्तात्रय शेगूकर)
हिंगोली- येथे विविध आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवस्थानावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच या प्रकरणात राजकीय विरोधक असण्याचीही शक्यता असून हल्लेखोरांचे संबंध मोठ्या लोकांशी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याबाबत मिलिंद उबाळे, ऍड. हर्ष बनसोडे, नीरज देशमुख, विशाल इंगोले, स्वप्नील वाठोरे, संतोष खंदारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. याशिवाय वंचित आघाडीच्या वतीनेही निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे, की काल आंबेडकरी अस्मितेचे प्रतीक असलेले राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून आज वंचित बहुजन आघाडी आणि इतर सामाजिक संघटनेच्या वतीने शहर पोलीस स्टेशन हिंगोली मा सय्यद साहेब पोलीस निरीक्षक निवेदन देण्यात आले. हिंगोलीमध्ये संचारबंदी लागू असल्यामुळे निवेदन देऊन संविधानिक पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला. आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा संपूर्ण जिल्हाभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी रवीभाऊ वाढे , ज्योतिपालभाऊ रणवीर , अतिकभाई, रतन लोणकर, राहुल पुंडगे, योगेश नरवाडे, विक्की काशिदे, विजय बनसोडे, दीपक सोनवणे, सिद्धार्थ गरपाळ आदी उपस्थित होते .

कनेरगाव नाका- हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथेही अविनाश कांबळे, निखिल कांबळे, नितीन पठाडे,  अमोल पठाडे, राहुल घुगे, रवी धुळे, आशिष गायकवाड, जुबेर पठाण, विशाल पठाडे, प्रेम भगत, नितीन रसाळ, प्रताप खिल्लारे आदींनीं निषेध करून याबाबत कनेरगाव नाका येथील पोलीस चौकीत निवेदन देण्यात दिले.

वसमत- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ऐतिहासिक पवित्र वास्तूवर झालेल्या हल्ल्याच्या तीव्र निषेध करून सामाजिक न्याय वीभागाचे हींगोली जील्हा अध्यक्ष गौतम दवने यांनी या हल्ल्याची सीआयडी द्वारे चौकशी करावी अशी तीव्र प्रतीक्रीया दीली आहे. जगृह हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ निवासस्थान आहे. या निवासस्थानात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य होते.त्यामुळे राजगृह ही पवित्र वास्तू आहे. मुंबईत दादरमधील राजगृह हे ग्रंथांसाठी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेली वास्तू आहे. ही वास्तू ग्रंथांसाठी म्हणून उभारलेली एकमेव वास्तू ठरू शकते.जगभरातील आंबेडकरी अनुयायांचे राजगृह प्रेरणास्थान ऊर्जास्थान आहे. ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि पवित्र असणा-या राजगृह या वास्तूवर हल्ल्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक आहे. राजगृहाचा अवमान करण्याचा हा पहिलाच निंदनीय प्रकार घडला आहे. या हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा करावी या मागे कुणाचा हात आहे हे शोधण्यासाठी या हल्ल्याची सीआयडीद्वारे सखोल चौकशी करावी अशी मागणी सामाजीक न्याय विभागाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष गौतम दवने यांनी अशी तीव्र प्रतीक्रीया दिली आहे.

भीम आर्मी, हिंगोली 
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर मुंबई येथे असलेले निवास्थान राजगृहावर केलेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी वसमत यांच्या मार्फत भीम आर्मी हिंगोली जिल्ह्याच्या वतीने देण्यात आले 
वसमत येथे भीम आर्मीचे निवेदन. छाया- श्रीधर वाळवंटे
भारतीय संविधानाचे निर्माते करोडो बहुजनांचे उदारकर्ते महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील ऐतिहासिक हिंदू कॉलनीत असलेले निवासस्थान राजगृहावर काल संध्याकाळच्या दरम्यान काही नराधमांनी नियोजपूर्वक कट रचून भ्याड हला केला आहे राजगृहा बाहेरील झाडांच्या कुंड्या तोडून सी सी टीव्ही कॅमेरे तोडले असून दगडफेक केली आहे. आजरोजि राजगृहा राहणारे आंबेडकर कुटुंबीयांना लक्ष करण्याचा दृष्टीने हा हल्ला केला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकासाठी बांधलेले राजगृह हे येतिहासिक वास्तू आहे त्या ठिकाणी जगभरातील बाबासाहेबांचे अनुयायी भेट देण्यासाठी येतात जे जगातील एकमेव पुस्तकासाठी व ग्रंथासाठी बांधलेले एकमेव घर आहे. हा हल्ला म्हणजे आमच्या अस्तितत्वावर,उर्जाभुमीवर, अस्मितेवर केला असून आंबेडकर अनुयायी याचा सर्वच स्थावररून निषेध व्यक्त करत असून महाराष्ट्र राज्यासह देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या घटनेचा भीम आर्मी आजाद समाज पार्टी जाहीर निषेध करीत आहे.
तरी राजगृहा मध्ये राहणाऱ्या आंबेडकर कुटूंबाला तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे तसेच राजगृहावर हल्ला करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा भीम आर्मीचे मराठवाडा सचिव आनंद खरे, राजरत्न भालेराव, देवा मोरे, निवृत्ती ढेंबरे, आनंद आवटे, पंकज लांडगे, कपिल पाईकराव, सचिन इंगोले, संकेत वाकळे आदींनी दिला आहे.

कळमनुरी- येथे वंचित बहुजन आघाडी कडून निषेध करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवानस्थान असलेले ग्रंथालय यावर काही जातीवादी व्यक्तींनी दगडफेक केली आहे. याचा कळमनुरी येथे मुख्यमंत्री तहसील कार्यालयामार्फत निवेदन देण्यात आले. आरोपींना २ दिवसात अटक नाही झाली तर जन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर राजू कांबळे ता. अध्यक्ष, आनंद पाईकराव, साहेबराव धनगर, सरपंच श्रावन दिपके, ऑल इंडिया पँथर तालुका अध्यक्ष अजय दांडेकर, अमोल पुंडगे, रतन बळखडे, सचिन कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

गोरेगाव- मुंबई येथील दादर येथील राजगृह निवास स्थानावर तोडफोडी हल्ल्याबाबत तात्काळ आरोपी वर कारवाई करा व अटक करा, अशी मागणी गोरेगाव भागातील नागरिकांनी केली आहे. मुबई दादर येथील भारत रत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानी. दिनांक ७ जुलै रोजी काही अज्ञात समाज कटकानी जाणीवपूर्वक दादर येथील भारत रत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानी जाऊन त्यांनी तोडफोड हल्ला करून मोठ नुकसान केले आहे-. या समाज कंटकानी बहुजन समाजाच्या अस्मितेवर हल्ला केला आहे. या अज्ञात समाज कंटकाचा शोध घेऊन त्यावर कडक कारवाई करण्यात आली पाहीजे, यासाठी गोरेगाव व बाभुळगाव येथील बोद्ध समाजाच्या वतीने गोरेगाव पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक यांना लेखी निवेदन देण्यात आले. यासाठी गोरेगाव व बाबुळगाव बौद्ध समाजातर्फे निवेदन मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह राजगृह असलेले बंगल्यावर काही अज्ञात इसमाने तोडफोड केल्याची घटना घडली असून ही घटना निंदनीय आहे याबाबत या घटनेचा लवकरच तपास लावून जो कोणी दोषी असेल त्याला तात्काळ अटक करावी अशा प्रकारचे निवेदन हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव व बाबुळगाव येथील बौद्ध समाजाच्या वतीने देण्यात आले आहे यावेळी हे निवेदन गोरेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले आहे अशा अनुचित प्रकार घडवणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करून त्याला अटक करावी अशा प्रकारचे निवेदन यावेळी गोरेगाव पोलिसांना देण्यात आला. या निवेदनावर नागेश मधुकर कांबळे, सुभाष रामभाऊ मोरे, संतोष पुंजाजी कांबळे, रमेश बळीराम रसाळ, राजकुमार वामन रसाळ, संदीप गोविंदा वैद्य, यशपाल रामराव तांदळे आदींच्या सह्या आहेत.

औढ्यात रिपब्लिकन सेनेचे अर्धनग्न आंदोलन

राजगृहावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करा, औंढा तहसीलदारांना निवेदन.

औंढा नागनाथ येथे रिपब्लिकन सेनेच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करून आज दिनांक 8 जुलै रोजी दुपारी चार वाजता औंढा तहसीलदार सचिन जोशी यांना निवेदन देण्यात आले सदरील निवेदनामध्ये सविस्तर वृत्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले व सध्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब वास्तव्यास आसलेले 'राजगृहा'वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते.

जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.आज संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय. हि घटना अतिशय निद़निय आसुन तात्काळ हल्लेखोरांना अटक करावी व राजग्रहाला कायमस्वरूपी zप्लस पोलीस संरक्षण द्यावे,या निवेदनावर किरण घोंगडे रिपब्लिकन जिल्हाप्रमुख हिंगोली ,आकाश सुतारे ,गोरख खिल्लारे,सागरदादा इंगोले,सुनील खंदारे.बाळु गायकवाड,यशवंतराव साळवे,अशिष मुळे,पंडित सर्यतळ,अनिल जमधाडे, असंघ घोंगडे, नागनाथ घोंगडे, बाळासाहेब साळवे, आदी कार्यकर्त्यांच्या सह्या होत्या .यावेळी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार भारत घ्यार, यशवंत गुरुपवार, बालाजी नरोटे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या