आंध्र प्रदेशात उभारला जाणार बाबासाहेबांचा भव्य पुतळा

मुख्यमंत्री रेड्डी यांच्या हस्ते झाली पायाभरणी, मैदानाचे नाव असेल बी.आर. आंबेडकर स्वराज मैदान

डीएम रिपोर्ट्स- तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या संकल्पनेतील भव्य दिव्य असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आता आंध्र प्रदेशाची राजधानी अमरावती येथे होण्याऐवजी ऐवजी विजयवाडा येथे होणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी बुधवारी दिनांक ८ जुलै रोजी दूरस्थपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ फूट उंच पुतळ्याची पायाभरणी केली. विजयवाडा येथील स्वराज मैदानावर उभारण्यात येणाऱ्या या स्मारकामुळे आता या मैदानाचे नाव डॉ. बी. आर. आंबेडकर स्वराज्य मैदान असे होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संग्रहित छायाचित्र. सौजन्य- गुगल, इंडिया.
या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी म्हणाले की, शहरातील नागरिकांना मुक्त श्वास घेण्यासाठी जशी शुद्ध हवा लागते, तसेच हे मैदान  जशी फुफ्फुसाची गरज असते, तसेच जनतेला मुक्त श्वास घेण्यासाठी मूर्तिमंत असे डॉ. आंबेडकर यांच्या सारख्या महान नेत्याबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.  पुढे बोलताना ते म्हणाले की, डॉ. आंबेडकरांचा हा भारतातील सर्वात उंच पुतळा असेल आणि २० एकरात उद्यान विकसित केले जाणार आहे. जगन रेड्डी यांनी असेही सांगितले की, डॉ. आंबेडकर या महान व्यक्तीने गेल्या १०० वर्षांपासून भारतातील आर्थिक, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या देशावर प्रभाव टाकला असून जगभरातील गरीब, पीडित आणि दलित लोकांसाठी आजही ते मसीहा ठरले आहेत. त्यामुळेच या महानेत्याची छायाचित्रे आणि पुतळे लोकांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मदत करतात, असेही मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वराज (पीडब्ल्यूडी मैदान) मैदानाचे नामकरण करण्याचे आदेश जारी केले आता त्याचे नामकरण डॉ. बी.आर. आंबेडकर स्वराज मैदान असे होणार आहे. या कार्यक्रमाला आंध्रचे मंत्री मेकाथोटी सुचारिता, वेलमपल्ली श्रीनिवास राव, पिनिपे विश्वरूप, आदिमुलापू सुरेश आणि पेर्णी व्यंकटारामैया आणि अनेक आमदार वैयक्तिकरित्या.
विजयवाडा येथे डॉ. आंबेडकर पुतळ्याचा शिलान्यास प्रसंगी मुख्यमंत्री आणि आंध्रचे मंत्री गण. सौजन्य- गुगल, इंडिया.
सध्या आंध्र प्रदेशच्या जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत असलेले हे मैदान लवकरच समाज कल्याण विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. आंध्र प्रदेश औद्योगिक पायाभूत सुविधा महामंडळाच्या (एपीआयआयसी) मदतीने एक त्याठिकाणी एक विशाल पार्क तयार करण्याबरोबरच अन्य विकास कामे करण्यात येणार आहेत. जगात सर्वात जास्त जर कुणाचे पुतळे असतील तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. भारताशिवाय बल्गेरिया, अमेरिका, कॅनडा, जपान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आदी देशांमध्येही बाबासाहेबांचे पुतळे स्थानापन्न असून जगभरातील पीडित, शोषित समाजाला बाबासाहेबांचे हे पुतळे प्रेरणा देत आहेत.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने