डीएम रिपोर्ट्स- पाय असणाऱ्या गोगलगायी प्रमाणे एकमेकांना चिटकून मोठी करीत पुढे जाणारे अर्ध-पारदर्शक दिसणारे हे जीवजंतू हिंगोली शहराजवळ असलेल्या अंधारवाडी (अकोला बायपास) भागातील शांतीनगर येथे आज २१ जून रोजी पहाटेच्या सुमारास जेष्ठ नागरीक नंदकिशोर कांबळे यांच्या घरासमोरील अंगणात पुन्हा अवतरले. चार दिवसांपूर्वी सुद्धा हे जंतू आढळून आले होते.
हिंगोली शहरात बहुधा अनेकांनी कधी न पाहिलेले नवीनच हे जंतू आहेत. आज परत हे जंतू आढळले असल्याने, त्या भागातील नागरिक, या विचित्र प्रकारामुळे चांगलेच बुचकळ्यात पडले आहेत. गोगलगाय प्रमाणे एकमेकांच्या अंगावर, एकमेकांना चिटकून हे जीवजंतू कधी गोलाकार, कधी त्रिकोणी, तर कधी सापासारखा आकार करून पुढे पुढे सरकत असतात.
त्यांना पाहण्यासाठी आज नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या सूक्ष्मजंतूंचा संबंधित माहिती देवून सुद्धा आरोग्य विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायत अंधारवाडीकडून दुर्लक्ष केले आहे. त्या भागातील नागरिकांमधिल भीती, शंका दूर होण्यासाठी तातडीने या सूक्ष्मजंतूचे निदान होणे गरजेचे आहे. सध्या कोरोना विषाणूच्या व्हायरसने नागरिक त्रस्त आहेत. अशातच आता नवीनच जातीचे हे कृमी, जंताप्रमाणे निघाल्याने भीतीचे वातावरण परिसरात पसरले आहे. कधीही न दिसणारे व ऐकविण्यात नसलेले हे जंतू चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून पाहण्यात आले नसल्याचे काही नागरिकांनी सांगितले. जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्याशी या जंतूबाबत माहिती दिली. परंतु दोन दिवस झाले तरीही आरोग्य विभागाचे पथक आले नाही.

Summary In English
Snail Like Micro Creatures Found In Hingoli
Semi-transparent creatures, clinging to each other like snails with legs, moving forward very slowly. The mysterious germs were found at Hingoli today. These germs are probably the first to be seen by many people in Hingoli. Since the germs were found back some 4 days ago, the citizens of the area were well confused by this strange type. Like snails, they cling to each other, sometimes circling, sometimes triangular, and sometimes snake-shaped. Despite providing relevant information about these micro-organisms, the health department, agriculture department and gram panchayat of Andharwadi have ignored them. District Health Officer of Zilla Parishad Dr. Shivaji Pawar has been informed about this germ. But he too not took cognizance of the worms.
या जीवजंतूंचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील व्हिडीओ लिंक क्लिक करा......
Latest Update...........
आरोग्य विभागाने डेमोक्रॅट महाराष्ट्राच्या वृत्ताची घेतली दखल; जिल्हा आरोग्य विभागाकडून नमुने पाठविले प्रयोगशाळेत
डेमोक्रॅट महाराष्ट्राच्या संकेतस्थळावर आज सकाळी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी दखल याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार हिवताप कार्यालयाच्या शिघ्र पथकाने भेट दिली व त्याठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले. सदरील सुक्ष्मजंतु हे डेंग्यु, चिकुन गुनिया, मलेरिया, हत्तीरोग या आजाराचे नसल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यात वैद्यकीय तपासणीचा राऊंड चालु आहे.
अंधारवाडीशांतीनगर भागात संपूर्ण ठिकाणी अशी तपासणी सर्वेक्षण करण्यात आले. आशास्वंयसेविका, आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फेत, तरी देखील सदर पथकाने शांतीनगर येथे नवीनच सूक्ष्मजंतू आढळून आल्याने सूक्ष्मजंतूंची पाहणी करत अबेटिंग औषधाचे त्या सूक्ष्मजंतूवर प्रयोग करून जिवंत राहतात किंवा मरतात याचा प्रयोग करण्यात आला. हायपावरचे औषधाचा वापर करत ते नष्ट झाले आहे. तसेच एका प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये सूक्ष्मजंतूचे सॅम्पल घेतले असून पुणे व नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून ते जंतू कोणत्या जातीचे आहेत याची माहिती घेण्यात येणार आहे. या पथकात यावेळी शिघ्रपथक प्रमुख अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सि.जी. रणवीर, वैद्यकीय अधिकारी डॉ. गुठठे, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी, किटक समाहारक यु. टी. डाफणे, वरिष्ठ क्षेञ कर्मचारी एम. एम. चौफाडे, ग्रामसेवक राजेश किल्चे, नरसी नामदेव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. बांगर, श्रीमती शिखरे, आशा स्वयंसेविका, आधारवाडी येथील सेवक मारुती इंगळे, आशा स्वंयसेविका, अंगनवाडीताई आदींची उपस्थिती होती.