डीएम रिपोर्ट्स/वसमत- कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर एक महिला अधिकारी असतानाही वसमत येथील तहसीलदार ज्योती पवार यांनी चांगले कर्त्यव्य बजावले असल्याने आज माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या वतीने पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
![]() |
वासमतच्या तहसीलदार ज्योती पवार यांचा सत्कार करताना माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर. छाया- नागेश चव्हाण, वसमत. |
राष्ट्रवादी काँग्रेस आणि राकाँ महिला आघाडी, वसमतच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तहसीलदार ज्योती पवार यांच्यासह डॉ. मारोती क्यातमवार, डॉ. मालिहा कौसर यांच्याही गौरव करण्यात आला. माजी मंत्री तथा महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर साहेब यांनी या कोरोना योद्ध्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविले. वसमतच्या तहसीलदार ज्योती पवार यांनी महीला असूनही जीवाची पर्वा न करता, जनतेसाठी गल्लीबोळात जाऊन जनतेची सेवा केली. यावेळी महिला अध्यक्षा सुनिता जाधव, सुभाष वाघमारे, उत्तम भोसले, गौतम दवणे व अमजद खान उर्फ नम्मू आदी उपस्थित होते.