Rural Youth Clears MPSC, Secures Post Of Dy. Collector सहाय्यक अधीक्षक भूमी अभिलेख पदावर काम करता करता झाले उपजिल्हाधिकारी....

डीएम रिपोर्ट्स- शेतकरी कुटुंबात वाढलेला आणि घरात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पदाचा कोणताही कौटुंबिक वारसा नसताना सुद्धा हिंगोली तालुक्यातील साटंबा येथील ३० वर्षे तरुण काही प्रयत्नांमध्येच उपजिल्हाधिकारी संवर्गातील परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे त्यांनी नांदेड येथे उपाधीक्षक भूमिअभलेख या पदावर काम करीत असताना त्यांनी हे यश मिळविले आहे. त्यापूर्वी ते चंद्रपूर जिल्ह्यात सहाय्यक डाक या पदावर कार्यरत होते. 
उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार
ज्ञानेश्वर प्रल्हाद घ्यार असे या तरुणाचे नाव आहे. प्राथमिक शिक्षण मुळगाव साटंबा येथेच झाले असून त्यानंतर दहावी, बारावी हे शिक्षण सुद्धा हिंगोली जिल्ह्यात झाले आहे. घरची परिस्थिती चांगली असली तरी प्रशासकीय सेवेतील अधिकारी पदाचा घरात कोणताही वारसा नाही. या स्थितीत स्पर्धा परीक्षा संदर्भात वर्तमानपत्रे आणि कोचिंग क्लासेसमधून माहिती मिळाल्यानंतर त्याने आपणाला मोठे अधिकारी व्हायचे हे स्वप्न बाळगले. आणि त्यानंतर या अधिकारीपदाची पायाभरणी म्हणून स्पर्धा परीक्षेच्या सर्वच छोट्या-मोठ्या पदाच्या परीक्षा देणे त्याने सुरू केले. यातच दोन वर्षांपूर्वी त्याला भारतीय टपाल खात्यात डाक सहाय्यक या पदावर नियुक्ती मिळाली. (Dnyaneshwar Ghyar was serving as Deputy Superintendent, Land Records In Nanded District and Earlier He was serving as Dak Assistant in Chandrapur District.)

चंद्रपूर जिल्ह्यात डाक सहाय्यक म्हणून काम करीत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे सुरू ठेवले आणि त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या उपाधिक्षक भुमी अभिलेख या पदाची परीक्षा सुद्धा यशस्वी पणे उत्तीर्ण केली याच पदावर ते नांदेड येथे सध्या कार्यरत आहेत. तर दीड वर्षांपूर्वी झालेल्या राज्य सेवा परीक्षेसाठी अर्ज केला. त्यामध्ये पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा झाल्यानंतर त्याने मुलाखतीत सुद्धा चांगले गुण प्राप्त केल्यामुळे काल शुक्रवारी जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतिम निकालात त्याला उपजिल्हाधिकारी संवर्गातील पदावर संधी मिळाली आहे. त्याच्या या यशामुळे साटंबा गावात ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला  असून यासंदर्भात ज्ञानेश्वरने सांगितले, की मी अभ्यास करत असताना माझे कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी सतत प्रोत्साहन दिले. तू सुद्धा अधिकारी होऊ शकतो असे ते नेहमीच सांगत असल्यामुळे मला बळ मिळाले आणि त्यातूनच मी आज या पदावर पोहोचलो आहे, असे सांगताना त्याने सर्वांचे आभार सुद्धा व्यक्त केले आहेत.
                    (ज्ञानेश्वर घ्यार आपले आई-वडील आणि कुटुंबीयांसोबत)

ज्ञानेश्वर घ्यार यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातच झाले आहे. तर दहावी आणि बारावी त्यांनी भांडेगाव येथे पूर्ण केली त्यानंतर अमरावती येथे डीएड अभ्यासक्रम पूर्ण केला. आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असताना त्याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात पदवीचे शिक्षण सुद्धा पूर्ण केले आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने