चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचेही केले आवाहन Ramdas Athawale Appeals To Bycot China Made Goods
डीएम रिपोर्ट्स- भारताने चीनला बुद्ध दिला आहे. युद्ध दिलेले नाही, तरीही चीनला युद्धाची खूपच खुमखुमी असेल तर भारतीय सैनिक चीनला कायमचा धडा शिकवतील अशा शब्दांमध्ये केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री डॉ. रामदास आवठले यांनी चीनला इशारा देतानाच देशवासीयांना चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
चिनी सैन्यासोबत झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले असून याच घटनेत चीनचे ४३ सैनिक मारले गेले असल्याचेही सांगितले जात आहे. या घटनेनंतर चीन भारताला दररोजच इशारे देत असून गलवान परिसर आपलाच असल्याचा दावा करीत आहे. तर भारताकडूनही चीनला चोख आणि जशास तसे उत्तर मिळत असल्याने चीनचा जळफळाट होत आहे. तर देशवासीयांमध्ये चीनबाबत तीव्र असंतोष निर्माण झाला असून चीनचे राष्ट्रध्वज जाळण्यापासून ते चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहीष्कार टाकण्यापर्यंत जनता संतापली आहे. त्यातच केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
तसेच "भारताने चीनला बुद्ध दिला आहे युद्ध दिलेले नाही. पण चीन ला युद्धाची खुमखुमी असेल तर भारतीय सैन्य चीनला कायमचा धडा शिकवतील.भारतात कोरोना शी युद्ध सुरू आहे. त्यामुळे आता आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा आहे. कोरोनाशी सुरू असलेले युद्ध जिंकणार आहोत आणि वेळ आल्यास चीनशीही युद्ध जिंकू." या शब्दात चीनला इशारा दिला आहे.