गोदावरी नदीच्या पात्रात मृत माशांचा खच Lakhs Of Dead Fishes Float In Godavari River At Nanded

डीएम रिपोर्ट्स- आज नांदेड येथील गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या सर्वच घाटामध्ये आज सकाळी लाखो मासे मृतावस्थेत आढळून आले  घटनास्थळाला महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी भेट दिली असून माशांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असून स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठातील संशोधकांच्या वतीने याची चौकशी करण्यात येत आहे.
नांदेड येथील कयाधू नदीला आज घडीला चांगले पाणी असून गेल्यावर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे नदी साधारणता वर्षभर पाण्याने खचाखच भरलेली होती.

त्याशिवाय कोरोना रोगाच्या साथीमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमूळे नदीपात्रात प्रदूषित पाणी सुद्धा जास्त प्रमाणात गेले नाही. यामुळे नदीपात्रातील पाणी चांगल्या अवस्थेत होते. असे असताना आज सकाळी गायत्री, नगिना, शनी मंदिर या सर्वच नदी घाटांमधील पाण्यामध्ये लाखो मासे मृतावस्थेत आढळून आले. त्यामुळे गोदावरी नदीवर सर्वत्र चंदेरी रंगाची किनार आली होती. सर्वत्र मृत माशे  दिसून येत होते. हे मासे कशामुळे मृत्यू पावले याचा शोध प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत आहे. नदीपात्रातील पाणी शुद्ध असले तरी या पाण्यात कोणी विषारी द्रव्य टाकले आहे का? किंवा माशांना पुरेसे खाद्य किंवा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला का? याबद्दल तपास करण्यात येत आहे. नदीपात्रातील माशांची संख्या वाढली असली तरी एकाच वेळी एवढ्या संख्येने मासे मरणे किंवा ऑक्सिजनच्या अभावी एकाच वेळी सर्व मासे मरून जाणेही शक्य नाही.

त्यामुळे या नदीपात्रात कोणी विषारी द्रव्य टाकले असावे किंवा विषारी द्रव्य पडले गेले असावे आणि त्यामुळे या माशांचा मृत्यू झाली झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. माशांची दुर्गंधी पसरू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने जेसीबी मशीन लावून सर्व मासे जमा करून त्यांची शहराबाहेर विल्हेवाट लावण्यात येत आहे. मानपा आयुक्त डॉ. संजय लहाने, जिल्हा न्यायदंडाधिकारी डॉ. विपिन इटणकर आणि इतरांनी घटनास्थळी भेट दिली. डॉ. अर्जुन भोसले, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख यांनीही  घटनेचा तपास करण्यासाचे काम हाती घेतले.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने