हज यात्रेवर कोरोनामुळे निर्बंध: सौदीत राहणाऱ्यांनाच यात्रा करता येणार Haj Pilgrimage Cancelled By Saudi Arabia

भारतातील सर्व २ लाख ३० हजार भाविकांना आपोआप पैसे परत मिळणार Haj Yatra Tourists Will Get Automatic Refund 

डीएम रिपोर्ट्स- कोरोना रोगामुळे सर्वत्र हाहाकार मजला असल्याने अनके धार्मिक परंपरा खंडित होत आहेत. धार्मिक बाबतीत अत्यंत कट्टर समजल्या जाणाऱ्या मुस्लिमांनाही याचा फटका बसत असून कोरोनामुळे त्यांनाही धार्मिक प्रथांमध्ये बदल करणे भाग पडले आहे. त्याचेच एक ताजे उदाहरण म्हणजे यावर्षीची हज यात्रा विदेशी मुस्लिमांसाठी प्रतिबंधित करण्यात आली असून सौदी अरबमध्ये मध्ये राहणाऱ्या काही ठराविक लोकांनाच आता ही  यात्रा करता येणार आहे.
हज यात्रेचे संग्रहित छायाचित्र.
मुस्लिम धर्मातील ५ तत्वांपैकी एक हज सर्वात पवित्र यात्रा मानली जाते. परंतु, जगभरात कोरोना रोग व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती http://hajcommittee.gov.in/Default.aspx या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. मुस्लिमांसाठी पवित्र असलेल्या आणि प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या पदस्पर्शामूळे पावन झालेल्या या भूमीतही कोरोनाचे तब्बल १ लाख ६१ हजार प्रकरणे उघड झाली असून त्यात सुमारे १५०० लोकांचा बळी गेला आहे. सौदीत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यापेक्षाही रोगाचा फैलाव आपल्या देशात जास्त प्रमाणात होऊ नये यासाठी हा निर्णय सौदी सरकारने घेतला आहे. त्यामुळे यावर्षीची ही यात्रा विदेशी नागरिकांना पूर्णतः बंदच करण्यात आली आहे. यावर्षी केवळ सौदी अरेबियात राहणाऱ्यांनाच आणि काही मर्यादित मुस्लिमांनाच हज यात्रा करता येणार आहे. डीएम रिपोर्ट्सनुसार, दरवर्षी २० ते २५ लाख भाविक देश-विदेशातून हज यात्रेला जात असतात. प्राप्त माहितीनुसार, गेल्यावर्षी २५ लाख मुस्लिम यात्रेमध्ये सहभागी झाले होते. तर त्यापैकी भारतातून सुमारे २ लाख २५ हजार भाविक गेले होते. यात्रेला जाण्यासाठी अगोदर जाण्या-येण्याचे भाडे आणि इतर शुल्क भरावे लागते. त्यांनतर त्यांना हज यात्रा करता येते. ही यात्रा महागडी असल्याने प्रत्येक मुस्लिम ती  करीत नाही.

About 2.30 Lakh Haj Tourists From India Had To Go Saudi Arabia This Year- 2020

भारतातून यावर्षी २ लाख ३० हजार लोकांनी यात्रेसाठी आगाऊ बुकिंग म्हणून जमा केलेले त्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात परत मिळणार असून त्यात महाराष्ट्रातील १० हजार ५०० जणांचा समावेश होता. केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी मंगळवारी याबाबत सांगितले की, "महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी भारतीयांना हज यात्रेवर पाठवले जाणार नाही असे निर्णय घेण्यात आला आहे. सौदी अरेबियाच्या हज मंत्र्यांनी सोमवारी रात्रीच हज यात्रा परदेशींसाठी रद्द झाल्याची माहिती दिली असून  यावर्षी भारतीयांना पाठवू नये असा सल्ला दिला होता." तर महाराष्ट्रातील फेडरेशन ऑफ हज पिलग्रिम्स सोशल वर्कर्सचे महासचिव शेख फैसल यांनी सांगितले की यात्रा रद्द झाल्यामुळे भाविकांना आता सौदी अरेबियात जाता येणार नाही. तसेच ज्या भाविकांनी पैसे जमा केले आहेत, त्यांना त्यांचे पैसे परत मिळणार असून ज्या माध्यमातून पैसे भरण्यात आले त्याच माध्यमाद्वारे भाविकांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने