माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे कोरोनामुळे निधन, Ex-MP Javle succumbs to Covid-19

डीएम रिपोर्ट्स/जळगाव- माजी खासदार आणि भाजपचे विद्यमान जिल्हा अध्यक्ष हरीभाऊ जावळे यांचे कोरोना साथ रोगामुळे निधन झाले. जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदार संघात चांगले प्रस्थ असलेले माजी खासदार जावळे यांना उपचारासाठी मुंबईत दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.
यावल तालुक्यातील भालोद हे मूळ गाव असलेले हरिभाऊ जावळे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ असा परिवार असून  आठवडाभरापूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर तातडीने त्यांना उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच जिल्ह्यात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, हरिभाऊ जावळे दोन वेळा जळगाव-रावेर मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले होते.  शिवाय, ते रावेरचे आमदारही होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना तिकीट मिळाल्याने ते जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने