कोठारी ग्रा.प. येथील महिला सदस्य तिसऱ्या अपत्यामुळे अडचणीत, Threat To Gram Panchayat Membership Due To Third Issue

सरपंच सविता मिटकर यांनीच केली कारवाईची मागणी

डीएम रिपोर्ट्स/वसमत-  वसमत तालुक्यातील कोठारी ग्राम पंचायतीची एक महिला सदस्य तिसऱ्या अपत्या मुळे चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. तिसरे अपत्य झाल्यामुळे त्यांना अपात्र घोषित करून त्याठिकाणी निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी गावाच्या सरपंच सविता मीटकर यांनीच तहसीलदारांकडे केली आहे. 
२०१५ ला ग्राम पंचायत सार्वजनिक निवडणूक घेण्यात आली होती. त्यात कोठारी येथील सविता दयानंद नरवाडे यांनी निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना विजय प्राप्त झाला होता. त्यांनी शपथपत्र सादर करताना दोन अपत्य असल्याचे निवडणूक आयोगाच्या घोषणपत्रात नमूद केले होते. परंतु त्यांना आता तिसरे अपत्य झाल्याने त्यांचा अडचणीत भर पडली आहे. सदर सदस्य महिलेस २८ मे २०२० रोजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पारडी ( बुद्रुक ) येथे तिसरे अपत्य झाल्याची नोंद आहे. मुंबई ग्रा.प. दुरुस्ती कायदा १९९५ चे कलम १४ ( ज -१) नुसार जर एखाद्या व्यक्तीला तिसरे अपत्य असल्यास किंवा झाल्यास त्या व्यक्तीला कुठलीही सार्वजनिक निवडणूक लढवता येत नाही, किंवा त्यास पदाचा उपभोग व फायदा होत नाही. म्हणून सदर व्यक्तीस पदावर राहण्याचा कायदेशीर अधिकार नाही. परंतु सदस्य सविता नरवाडे यांनी कायद्याच्या कक्षेत न राहाता व निवडणूक आयोगाने घालुन नियम व अटीचे उल्लंघन केल्याचा आरोप सरपंच सविता मिटकर यांनी  केला असून याबाबत त्यांनी तहसीलदारांना तसे निवेदन सुद्धा दिले आहे. सदरील सदस्याने शपथपत्रातील घोषणा पत्रातील माहिती लपवून ठेवल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. त्यामळे आता तहसीलदार या तक्रारीनुसार कधी कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या