हिंगोली: पोलीस मुख्यालयातच जमादाराची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या, Police Personnel Shoots Self, Dies On The Spot

घशावर झाडलेली गोळी थेट डोक्याच्या माथ्यावरुन निघाली.....

डीएम रिपोर्ट्स- हिंगोली जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेले जितू साळी (४०) यांनी आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. सदर पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात आल्यानंतरच याचे कारण स्पष्ट होणार आहे.
 
जितू साळी हे हिंगोली जिल्हा पोलिस दलात गेल्या दहा ते बारा वर्षांपासून कार्यरत होते. आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांनी पोलिस मुख्यालयात  डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. गोळीचा आवाज आल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी जाऊन पाहिले असता ते रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले असल्याचे दिसून आले. पोलिस मुख्यालयातील  पोलिसांनी त्यांना वाचविण्याचे प्रयत्न केले. परंतु त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. साळी यांनी नैराश्यातून आत्महत्या केली, की त्यांना आत्महत्या करण्यासाठी कोणी प्रवृत्त केले, याबाबतचा तपास पोलिस करीत आहेत.

घशावर झाडलेली गोळी थेट डोक्याच्या माथ्यावरुन निघाली.....

जितेंद्र साळी यांनी त्यांच्याकडील एसएलआर बंदुकीने गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांनी झाडलेली गोळी त्यांच्या डोक्याच्या माथ्यावरुन निघाली आहे. त्यामुळे त्यांनी बंदुकीचे ट्रिगर दाबण्याचे पूर्वी   रायफलचे बॅरल आपल्या जबड्याच्या खाली घशाजवळ धरले असावे. त्यानंतर ट्रिगर दाबताच, क्षणार्धात ती गोळी डोक्याच्या मेंदूला भेदून माथ्यावरुन निघाली असावी. या घटनेत मेंदूला गंभीर इजा पोहोचताच क्षणार्धात जितेंद्र साळवे यांचा जागीच मृत्यू झाला.

शस्त्र दुरूस्ती करण्यात निपून

मूळचे कळमनुरी येथील रहिवासी असलेले आणि सध्या हिंगोलीतील नवीन पोलिस वसाहतीत वास्तव्यास असलेले जितेंद्र साळी हे हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या शस्त्रागार विभागात गेल्या दहा ते बारा वर्षांपासून कार्यरत होते. पोलिसांची शस्त्रे दुरुस्त करणे, शस्त्रांची नियमित सर्व्हिसिंग करण्याचे काम करीत होते. ज्या शस्त्रांना ते दुरुस्त करीत होते, त्यांची देखभाल करीत होते. तेच शस्त्र स्वतःवर चालवून त्यांनी आयुष्याची शोकांतिका घडवून आणली आहे. त्यामुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नीसह दोन मुले आहेत. त्यांचा एक भाऊ हिंगोली पोलिस दलात कार्यरत आहे.

कशी आहे एसएलआर बंदूक?

एसएलआर म्हणजेच सेल्फ लोडींग रायफल. ही बंदूक १९५४ पासून वापरात असून सुमारे ८०० मीटरपर्यंत अचूक निशाणा साधू शकते. ही रायफल ऑटोमॅटिक लोड होत असल्यामुळे त्यातून निघणाऱ्या गोळ्या धाडधाड आवाज करीत शत्रूचा वेध घेत असतात. पोलिसांकडे असलेल्या ३०३ बंदुकीनंतर ही महत्त्वपूर्ण रायफल आहे. हिंगोली सारख्या जिल्ह्यांमध्ये पोलिसांकडे अशा शस्त्रांचा वापर खूप कमी होत असतो. नक्षलग्रस्त भागांमध्ये आणि मुंबई, पुणेसारख्या   अतिरेकी कारवाया सक्रिय असलेल्या भागात यापेक्षा जास्त क्षमतेच्या रायफल पोलिसांच्या शस्त्रागारात असतात.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने