पीटीआय वृत्तसंस्थेने सरकारच्या हवाल्याने दिले आहे वृत्त
Now All Eyes On PM Modi's Next Move
डीएम रिपोर्ट्स- भारत आणि चीनमध्ये लडाख भागात दोन्ही देशांच्या सीमेवर झालेल्या वादावादी आणि गोळीबारामध्ये ३ नव्हे तर कमीत कमी २० सैनिक शाहिद झाले आहेत. ही सर्वात मोठी बातमी असून यामुळे प्रत्यक्ष सीमेवर काय स्थिती असेल याचा अंदाज आल्याशिवाय राहणार नाही. पीटीआय आणि एएनआय या प्रसिद्ध वृत्तसंस्थांच्या वतीने लष्करी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली असून चीनचे ४३ सैनिक ठार झाल्याचेही वृत्त असून याबाबत चीनकडून अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. या घटनेमुळे भारत आणि चीनमध्ये भविष्यात आणखी तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारत-चीन सीमेवर गलवान घाटीत गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये ताणाव निर्माण झाला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय सैनिकी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा करून दोन्ही बाजूच्या सैनिकांना मागे हटण्यासाठी प्रयत्न चालू असतानाच चीनने भारतीय सैन्यावर हल्ला केला. यामध्ये १ कर्नल आणि दोन २ जवान शाहिद झाले असल्याचे प्रथम वृत्त आले होते. तर आता ताज्या आकडेवारीनुसार पीटीआय या प्रसिद्ध वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने वृत्त देऊन चीनसोबत झालेल्या वादात तीन नव्हे तर १० जवान शाहिद झाले असल्याचे सांगितले होते. तर एएनआय या व्रुत्तसंस्थेच्या वतीने २० जवान शहिद झाल्याचे म्हटले होते. शेवटी लष्करी हवाल्याने दोन्ही वृत्तसंस्थांनी या घटनेत २० सैनिक शहीद झाले असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भारत-चीन सीमेवर मोठा तणाव निर्माण झाला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर सर्व देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे.