बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने "#साकेत बचाओ, विरासत बचाओ आंदोलन"ची हाक;

8448568822 या मोबाईल नंबरवर फोन करून देऊ शकता समर्थन.....

डीएम रिपोर्ट्स- रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाच्या प्रकरणात बौद्ध धर्मियांनी अयोध्या ही रामजन्मभूमी नसून बुद्ध नगरी साकेत असल्याने, रामजन्मभूमीची जागा बौद्धांच्या ताब्यात देण्याबाबत आपले म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली नाही. आणि नंतरच्या काळात या प्रकरणावर  एक दिवाणी प्रकरण म्हणून न्यायनिर्णय होण्याऐवजी हिंदू-मुस्लिमांमध्ये समझोता होईल असा निर्णय देण्यात आला. तर आता रामजन्मभूमीच्या ठिकाणी सुरु असलेल्या खोदकामात रामा जन्माचे कोणतेही पुरावे तर मिळत नाहीतच; उलट त्याठिकाणी सर्वत्र बुद्ध मूर्ती आणि बौद्ध धर्मीय पुरातन विहार, चैत्यगृह आदींचे अवशेष सापडत आहेत. त्यामुळे अयोध्या ही रामजन्मभूमी नसून बुद्ध नगरी साकेत असल्याचे सिद्ध झाल्याने, आंतरराष्ट्रीय स्तरावरील बौद्ध धर्मियांच्या बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने "साकेत बचाओ, विरासत बचाओ आंदोलन"ची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी 8448568822 या मोबाईल नंबरवर फोन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

बामसेफचे प्रमुख आणि संबंधित सर्व संघटनांचे मार्गदर्शक वामन मेश्राम यांच्यासह विविध संघटनांचे प्रमुख, संघटक आदींनी #साकेत_बचाओ_विरासत_बचाओ_आंदोलन असा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर आवाहन केले आहे. सध्या लॉकडाऊन आणि कोरोना साथरोग पसरलेला असल्याने हे अभियान सोशल मीडियावर विशेषतः ट्विटरवर सर्वात जास्त ट्रेंडिंग होणारे अभियान ठरले आहे. संयोजकांकडून या आंदोलनाला भारत देशभरातील नागरिकांनी समर्थन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानाला समर्थन देण्यासाठी 8448568822 या मोबाईल नंबर वर फोन करायचा आहे. त्यानंतर गुगल फॉर्म भरून समर्थन देणाराने आपली माहिती पाठवायची आहे. 
याच फॉर्मच्या आधारे नंतर न्यायालयात लढा देण्यात येणार आहे. समर्थन देण्याचा फॉर्म भरण्याची देण्याची इच्छा असणाऱ्यांनी पुढील गुगल फॉर्म लिंकवर क्लिक करायचे आहे. - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfJc_NOUw5saEUVsIOXm_AwNbLRfjGQ4yF_rwTsWbVlGPpohg/viewform बहुजन बांधवांनी वामन मेश्राम आणि त्यांच्या सहयोगी नेत्यांनी सुरु केलेल्या या अभियानाला समर्थन देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आयोध्या येथे राम मंदिर होते की बाबुल मशीद होती याबाबत न्यायालयात अनेक वर्षांपासून चालू होता. या वादाचा नुकताच निकाल लागला असून त्या अंतर्गत संपूर्ण बाबरी मशिदीची जागा भरा मंदिराला देण्यात आली असून मशिदीसाठी स्वतंत्र जागा देण्याची निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच राम मंदिर उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाचा निकाल म्हणजे एक प्रकारे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तोडगा करून देण्यात आला आहे. याच मुद्द्यावर एमआयएमचे प्रमुख असासुद्दीन ओवेसी यांनी न्यायालयाच्या या निर्णयाला विरोध केला असून न्यायालयाने न्याय न देता, तोडगा काढला आहे, जे की न्याय तत्वाच्या विरोधी बाब आहे. मुळात राम मंदिराच्या जागेवर बाबरी मशिदी बांधण्यात आल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. तर त्या ठिकाणी पुरातन साकेत नगरी म्हणजेच बुद्ध नगरी होती हे आता होत असलेल्या खोदकामावरून स्पष्ट झाले आहे. त्या ठिकाणी बौद्ध विहार मोठ्या संख्येने होते आणि त्याच जागेवर श्रीरामाचे मंदिर स्थापन करण्यात आल्याचा दावा यापूर्वी अनेक विद्वानांनी इतिहासकारांनी केला आहे. 
राम मंदीर बांधण्यासाठी सध्या चालू असलेल्या उत्खननामध्ये त्या ठिकाणी रामाची अस्तित्व होते याबाबतचा कोणताही पुरावा तर सापडला नाहीच; उलट सर्वत्र बुद्धमूर्ती आणि शिलालेख ज्यावर बौद्ध धर्माच्या प्रतिकृती चिन्हांकित केल्या आहेत, ते सापडले आहेत. त्यामुळेच अखिल भारत स्तरावर साकेत बुद्धनगरी अर्थात आयोध्या बुद्धनगरी, साकेत बचाओ, विरासत बचाओ हे अभियान हाती घेण्यात आहे. ट्विटर या सामाजिक माध्यमावर दहा दिवसांपूर्वी "साकेत बुद्धनगरी" हा ट्रेंड सर्वात जास्त चालला होता आणि करोडो लोकांनी त्याला समर्थन दिले होते. यावरूनच साकेत बुद्ध नगरी या अभियानाला भारत देशातून बहुजन समाजाचे करोडोंच्या संख्येने पाठबळ असल्याचे स्पष्ट होत आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने