जाणून घ्या कोणते आहेत बंदी घातलेले ॲप्लिकेशन्स
डीएम रिपोर्ट्स- चीन सोबत सुरू असलेल्या तणावामुळे भारताने चिनी बनावटीच्या, चिनी कंपन्यांनी तयार केलेल्या तब्बल ५९ मोबाईल ॲप्लिकेशन्सवर बंदी घातली असून या बंदी घालण्यात आलेल्या ॲप्लिकेशनमध्ये टिकटॉक, शेअरइट, कॅम स्कॅनर, लाईक, हॅलो सारख्या ॲप्लिकेशन्सचा समावेश आहे.
माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कायद्याच्या कलम ६९ (अ) नुसार ही बंदी घालण्यात आली आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार मंत्रालयाकडे चिनी बनावटीच्या अनेक एप्लीकेशन वापरकर्त्यांनी त्यांच्या मोबाईल मधील गोपनीय माहिती व इतर संवेदनशील माहिती चोरी गेल्याची, असुरक्षित झाली असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर या ॲप्लिकेशन्सवर बंदी घालण्यात आली असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे आहे.
माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने पुढील प्रमाणे प्रसिद्धीपत्रक दिले आहे. The press release by Ministry of Information and Technology says, "The Ministry of Information Technology, invoking it’s power under section 69A of the Information Technology Act read with the relevant provisions of the Information Technology (Procedure and Safeguards for Blocking of Access of Information by Public) Rules 2009 and in view of the emergent nature of threats has decided to block 59 apps since in view of information available they are engaged in activities which is prejudicial to sovereignty and integrity of India, defence of India, security of state and public order". It also reads, "many representations raising concerns from citizens regarding security of data and risk to privacy relating to operation of certain apps". The press release further mentions that, "The Computer Emergency Response Team (CERT-IN) has also received many representations from citizens regarding security of data and breach of privacy impacting upon public order issues,"
भारताने बंदी घातलेले ॲप्लिकेशन्समध्ये पुढील ॲप्लिकेशन्सचा समावेश आहे.
TikTok, Shareit, Kwai, UC Browser, Baidu map, Shein, Clash of Kings, DU battery saver, Helo, Like, YouCam, Makeup, Mi Community, CM Browers, Virus Cleaner, APUS Browser, ROMWE, Club Factory, NewsDog, Beautry Plus, WeChat, UC News, QQ Mail, Weibo, Xender, QQ Music, QQ Newsfeed, Bigo, Live, Selfie City, Mail Master, Parallel Space, Mi Video, Call Xiaomi, WeSync, ES File Explorer, Viva Video, QU Video, Inc, Meitu, Vigo, Video, New Video Status, DU Recorder, Vault- Hide, Cache Cleaner, DU App Studio, DU Cleaner, DU Browser, Hago Play, With New Friends, Cam Scanner, Clean Master, Cheetah Mobile, Wonder Camera, Photo Wonder, QQ Player, We Meet, Sweet Selfie, Baidu, Translate, Vmate, QQ International, QQ Security Center, QQ Launcher, U Video, V fly, Status Video, Mobile Legends, DU Privacy.
आता बंदीमुळे चिनी कंपन्यांना मिळविणारा करोडो रुपयांचा महसूल बुडणार आहे. या ॲप्लिकेशन्सवर इंटरनेट वापर आणि जाहिरातींमधून महसूल जमा केला जातो. जागतिक इंटरनेट वापराचा विचार केल्यास सर्वात जास्त इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये भारत जगात चीननंतर दुसऱ्या राष्ट्र आहे. त्यांनतर तीन क्रमांकावर अमेरिका आहे. या महसुलातून चिनी कंपन्या गब्बर झाल्या असून याच पैशाचा वापर चीन भारताविरुद्ध करीत आहे. त्यामुळे गलवान घाटीत झालेल्या मारामारीत भारतचे २० जवान शाहिद झाल्यानंतर चिनी उत्पादनांविषयी देशभरात रोष निर्माण झाला असून त्यातच आता भारत सरकारने ही बंदी घातली आहे.