लाचलुचपत विभाकडून महिनाभरात झालेली चौथी कारवाई
Fourth Raid By ACB, Hingoli In One Month
डीएम रिपोर्ट्स- येथील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात आज दुपारी लाचलुचपत विभागाच्या वतीने
लावलेल्या सापळ्यात कृषी सहाय्यक शिंदे हा १३०० रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अडकला. लाच लुचपतच्या जाळयात सरकारी कर्मचारी अडकण्याची गेल्या महिनाभरातील ही चौथी घटना आहे. फिर्यादी असलेल्या एका कृषी दुकानदाराला लायसन्स देण्यासाठी आरोपीने पैशांची मागणी केली होती. प्रकरण १३०० रुपयांवर ठरल्यानंतर फिर्यादीने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात फिर्याद दिली. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या वतीने अगोदर पडताळणी झाली आणि आज सापळा रचुन त्याला अडकविण्यात आले. ठरल्यानुसार फिर्यादीकडून कृषी सहाय्यक प्रदीप शिंदे याने रक्कम स्वीकारताच, लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. येथील लाचलुचपतच्या वतीने लावण्यात आलेल्या सापळ्यात मागील एक महिन्यात १ पोलीस, १ तलाठी, १ मंडळ अधिकरी आणि आज कृषी सहाय्यक असे चार कर्मचारी अडकले आहेत.