आबेडकरवादी मिशनचा अरविंद रायबोले डीवायएसपी पदावर Ambedkarite Mission's Arvind Raibole Secures Post Of DySP In MPSC

डीएम रिपोर्ट्स- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत नांदेड येथील आंबेडकरवादी (Ambedkarite) मिशनचा विद्यार्थी अरविंद नारायण रायबोले याची डीवायएसपी या पदासाठी निवड झाली आहे.
Deepak Kadam Felicitating Arvind Raibole
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा- २०१९ चा अंतिम निकाल १९ जून रोजी घोषित झाला आहे. राज्यभरातील ४२० विद्यार्थ्यांनी अधिकारी पदावर आपले शिक्कामोर्तब केले. त्यामध्ये नांदेड येथील आंबेडकरवादी मिशनचा अरविंद रायबोले याने ४९० गुण प्राप्त करून डीवायएसपी या पदावर शिक्कामोर्तब केले आहे. लोहा तालुक्यातील असलेला अरविंद रायबोले हा विद्यार्थी अत्यंत गरीब परिस्थितून आलेला असून त्याने गेल्यावर्षी कर निरीक्षक या परीक्षेत राज्यात अनुसूचित जाती प्रवर्गातून प्रथम क्रमांक पटकाविला होता. तरं आता पोलीस उपाधीक्षक पदी नियुक्ती झाल्याने मोठे यश मिळाले आहे. या यशाबद्दल आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी त्याचा सत्कार केला.

काय आहे आंबेडकरवादी मिशन? What's Ambedkarite Mission
Ambedkarite Mission's Blue House, Nanded.
प्रशासकीय अधिकारी राहिलेले दीपक कदम यांनी क्लास वन अधिकारी पदाचा राजीनामा देऊन १० वर्षांपूर्वी आंबेडकरवादी मिशन सुरु केले. केवळ अधिकारी तयार करणे हा उद्देश न ठेवता त्यांनी बहुजन समाजातील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांमधून कट्टर आंबेडकरवादी अधिकारी तयार करण्याचा सामाजिक उपक्रम सुरु केला आहे.

त्यातूनच आजघडीला संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आजघडीला १६३ पेक्षा अधिक अधिकारी घडविले आहेत. फौजदार पदावर २०० पेक्षा जास्त, राज्यसेवा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून २५० पेक्षा जास्त आणि बँकिंग परीक्षेत सुद्धा अधिकारी पदावर ६० पेक्षा अधिक विध्यार्थी गेले आहेत. नांदेड येथील आंबेडकरवादी मिशनमध्ये बहुजन समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांकडून पुणे, दिल्ली येथील स्पर्धा परीक्षा केंद्रांच्या तुलनेत केवळ ५ टक्के दानमूल्य घेऊन ते विद्यार्थ्यांना मोफत निवास, अभ्यासिका, ग्रंथालय, दर्जेदार आणि अद्ययावत नोट्स उपलब्ध करून देत असतात. त्यामुळेच नांदेड येथील मिशनचे ब्लू हाऊस हे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांचे माहेर बनले आहे.

विशेष म्हणजे या केंद्राचे प्रमुख दीपक कदम यांनी केवळ आणि केवळ आंबेडकरवादी अधिकारी तयार करण्याच्या एकाच जीवनध्येयाने लग्न न करता अविरत हा सामाजिक यज्ञ चालू ठेवला आहे. सामाजिक देणग्या आणि विद्यार्थ्यांनी केलेली मदत यावरच हे केंद्र आज चालत आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने