ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद शाबीत; उमेदवारी अर्ज दाखल, Udhav Thackrey files nomination for Vidhan Parishad, election likely unuppose

उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता पदाला धोका नाही

डीएम रिपोर्ट्स-  शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषद सदस्यत्वासाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत पर्यावरण मंत्री तथा त्यांचे पुत्र  आदित्य ठाकरे, सामनाच्या संपादक तथा त्याच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि शिवसेनेचे नेते मंडळी उपस्थित होती. निवडणूक निर्णय अधीकारी राजेंद्र भागवत यांच्याकडे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने आणि शिवसेनेकडून त्यांचा विजय निश्चित असल्याने उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद शाबीत राहणार आहे. याबरोबरच आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या उमेदवारांनीही आपले अर्ज दाखल केले. त्यामुळे आता निवडणूक झाल्यास २१ मे रोजी मतदान होणार आहे. परंतुुुुु काँग्रेस पक्षाने दोन उमेदवारांचा आग्रह सोडल्याने ही निवडणूूूक जवळपास बिनविरोध होण्याचे निश्चित झाले आहे.  
.

एखादा मंत्री कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर शपथ घेतल्यानंतर त्याला नियमानुसार सहा महिन्यात त्या राज्यातील कोणत्याही एका सभागृहाचा किंवा तो मंत्री भारत सरकारचा असेल तर त्याला संसदेच्या कोणत्याही एका सभागृहाचा सदस्य होणे गरजेचे असते. २८ मे रोजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या शपथेला सहा महिने पूर्ण होणार आहेत. त्यामुळे त्यापूर्वी त्यांना विधानसभा किंवा विधान परिषदेचा सदस्य होणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. नसता त्यांना मुख्यमंत्री पदावरून राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता. महाराष्ट्र विधानपरिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी ३, काँग्रेसचे २ तर शिवसेना १ असे एकूण ९ सदस्य निवृत्त झाले आहेत. विधानसभेतील एकूण संख्याबळानुसार यावर्षी उमेदवाराला निवडून येण्यासाठी २९ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. तर राज्याच्या पक्षीय समीकरणानुसार पुढील प्रमाणे पक्षीय सदस्यांचे संख्याबळ आहे. त्यात भाजपकडे १०५, शिवसेनेकडे ५६, राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५४, काँग्रेसचे ४४, बहुजन विकास आघाडी ३, समाजवादी पार्टी, एमआयएम आणि प्रहार जनशक्ती यांच्याकडे प्रत्येकी २, मनसे, माकप, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, जनसुराज्य पक्ष आणि क्रांतिकारी शेतकरी पक्ष यांच्याकडे प्रत्येकी १ असे संख्याबळ आहे. याशिवाय अपक्ष १३ आमदार आहेत. त्यातून निवडून येण्यासाठी एका जागेसाठी २९ मतांची गरज आहे. त्यामुळे या निवडणुकीत १ जागेसाठी चुरस निर्माण होणार आहे.  तर सध्याच्या पक्षीय बलाचा आणि रिक्त झालेल्या जागांचा  विचार केल्यास महाविकास आघाडीच्या ६ आणि भाजपच्या ३ जागा सहज निवडून येणार आहेत. त्यातही घोडेबाजार झाल्यास त्यात  भाजपला  एक जास्तीची जागा मिळू शकते.

पक्षनिहाय उमेदवार

शिवसेनेचे उमेदवार
उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हे

काँग्रेसचे उमेदवार
राजेश राठोड 

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार
शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी

भाजपचे उमेदवार 
रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि डॉ. अजित गोपछेडे

निवडणूक झालीच तर कार्यक्रम पुढील प्रमाणे

११ मे - पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार
१२ मे – अर्जांची छाननी
१४ मे- पर्यंत माघारीघेता येणार
२१ मे- रोजी मतदान  आणि मतमोजणी व निकाल

Summary in English Language
 
Shiv Sena chief and Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray today filed his nomination papers for the Legislative Council. He was accompanied by Environment Minister and his son Aditya Thackeray, Saamna Newspaper editor and his wife Rashmi Thackeray and Shiv Sena leaders. He filed his nomination papers with Returning Officer Rajendra Bhagwat. Uddhav Thackeray's Chief Ministership will be intact and have no danger this times, as he has filed his nomination papers and his victory from Shiv Sena is certain. If a Minister is not a member of any House, he is required by law to become a member of any House of Assembly in that State or of if he is minister of Government of India then he has to become member of any either house the Parliament within six months after taking oath of office. 

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने