कोरोणामुळे नैराश्य; मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे सासरे तथा कामगार नेते दादा सामंत यांची आत्महत्या; Labor Leader Dada Samant Commits Suicide

डीएम रिपोर्ट्स- ज्येष्ठ कामगार नेते आणि दत्ता सामंत यांच्यानंतर मुंबईतील कामगार चळवळीचे यशस्वी नेतृत्व करणारे डॉक्टर दादा सामंत यांनी आज सकाळी रोगाच्या साठी तून आलेल्या कशामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली दादा सामंत हे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे सासरे होत.
डॉ. दादा सामंत हे 'कामगार आघाडी'चे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ कामगार नेते होते. लोणार साथरोग काही केल्या आटोक्यात येत नाही आणि त्यातच त्यांना आलेले वार्धक्य शिवाय काही दिवसांपूर्वीच त्यांचे जावई जितेंद्र आव्हाड यांना झालेल्या कोरोना रोगामुळे ते खचून गेले होते. कुरूना रोगामुळे मुंबईतील सर्व रिकामे रस्ते आणि सर्वत्र पसरलेले नैराश्य यामुळे दादा सामंत यांनाही नैराश्याने ग्रासले होते आणि त्यातच त्यांनी आज आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते प्रसिद्ध कामगार नेते दिवंगत डॉ. दत्ता सामंत यांचे थोरले बंधू आणि  कामगार आघाडीचे अध्यक्ष भूषण सामंत यांचे ते काका होत. त्यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि आरोग्यविषयक समस्यांमुळे आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. या प्रकरणी दहिसर पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दादा सामंत यांच्या पश्चात पत्नी प्रमोदिनी, तीन विवाहित कन्या गीता, नीता आणि रुता, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दादा सामंत यांचा जन्म १९३० मध्ये झाला होता. ते मुंबईतील कामगार नेते आणि कामगार कायद्याचे अभ्यासक होते. १९८१ मध्ये मुंबईत झालेल्या गिरणी कामगारांच्या संपानंतर दादा सामंत यांनी ग्वाल्हेर येथील मिलमधील नोकरी सोडून दत्ता सामंत यांच्यासोबत कामगार युनियनमध्ये सक्रिय सहभाग घेतला. डॉ. दत्ता सामंत यांची जानेवारी १९९७ मध्ये हत्या झाल्यानंतर १८ जानेवारी १९९७ ते ९ मे २०११ पर्यंत दादा सामंत यांनी कामगार आघाडी आणि संलग्न युनियनचे अध्यक्षपद सांभाळून यशस्वी नेतृत्व केले दादा सामंत यांच्या आत्महत्येमुळे कामगार चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोना रोगाच्या साथीमुळे प्रत्यक्ष रोगाची लागण झाल्यावरच मृत्यू होतो, असे नाही तर या जागतिक महामारीमुळे अनेकांना नैराश्य आले आहे आणि त्यात बरेचसे नागरिक नैराश्यातून आत्महत्या करीत असतात. किंवा साथीच्या आजारांमुळे घाबरून जाऊन त्यांचा मृत्यू होत असल्याचे हे जिवंत उदाहरण आहे.

Summary in English

Depression due to corona;  Minister Jitendra Awhad's father-in-law and labor leader Dada Samant commits suicide ...


After senior labor leader and Datta Samant, Dr. Dada Samant, a successful leader of the labor movement in Mumbai, committed suicide by strangulation this morning due to illness. Dada Samant was the father-in-law of state Housing Minister Jitendra Awhad.

 Dr.  Dada Samant was a former president of the Kamgar Aghadi, a senior labor leader.  Lonar's communicable disease is not under control and he was exhausted due to corona disease of his son-in-law Jitendra Awhad a few days back.  Dada Samant was also devastated by the Kuruna disease and all the empty streets in Mumbai and the widespread depression. He committed suicide by hanging himself at his residence today.  The famous labor leader, the late Dr.  He was the elder brother of Datta Samant and uncle of Bhushan Samant, president of Kamgar Aghadi.  The letter was found by police, who said he was committing suicide due to the increasing incidence of corona and health problems.  An accidental death has been reported to Dahisar police in the case.  Dada Samant is survived by his wife Pramodini, three married daughters Geeta, Nita and Ruta, son-in-law and grandchildren.  Dada Samant was born in 1930.  He was a labor leader in Mumbai and a student of labor law.  After the strike of the mill workers in Mumbai in 1981, Dada Samant quit his job at the mill in Gwalior and joined Datta Samant in the trade union.  Dr.  After the assassination of Datta Samant in January 1997, Dada Samant successfully led the workers' front and affiliated unions from January 18, 1997 to May 9, 2011. Dada Samant's suicide has caused great damage to the labor movement.  Outbreaks appear to be exacerbated during the Corona epidemic, but the global epidemic has left many depressed and many people committing suicide out of frustration.  Or it is a living example of an epidemic of panic attacks.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने