कोरोना कहर! हिंगोलीत आणखी १४ राज्य राखीवच्या जवानांना लागण, एकूण रुग्ण संख्या गेली ८९ वर

डीएम रिपोर्ट्स/हिंगोली-  जिल्ह्यासाठी आणखी आणखी धक्कादायक बातमी म्हणजे सोमवारी एकाच दिवशी राज्य राखीव पोलिस दलातील २३ जवानांचे कोरोना रोगाचे वैद्यकीय अहवाल सकारात्मक आले होते. आज पुन्हा त्यात १४ ची वाढ झाल्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आता तब्बल ८९ झाली आहे.
सामान्य रुग्णालय प्रशासनाच्या सोमवारच्या  अहवालानुसार  एसआरपीएफच्या २३ नवीन जवानांना  कोरोनाची  लागण झाली होती. हे जवान मुंबईत बंदोबस्तात होते. तर कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका परीचारिकेलाही लागण झाली होती. कालच्या आकडेवारीनुसार जिल्ह्याचा आकडा ७६ होता. तर आज त्यात पुन्हा भर पडली आहे. आज राज्य राखीव पोलिस दलातील १४ जवानांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या ९० झाली. तर एका रुग्णाला सुट्टी देण्यात आली असल्याने आजघडीला जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ८९ झाली आहे. विशेष म्हणजे ६ रुग्ण वगळता इतर सर्व रुग्ण हे राज्य राखीव पोलीस दलातील जवान आहेत. या या जवानांनी मुंबई मालेगाव याठिकाणी कोरोना संचारबंदी दरम्यान कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे या जवानांना सुद्धा कोरोना लागण झाली आहे. कर्तव्य पार पाडून ते हिंगोलीत आले असताना त्यांना जिल्हा प्रशासनाने विलगीकरण कक्षात ताबडतोब हलविले. परंतु प्रशासनाने मुंबई आणि मालेगाव तेथे कर्तव्य बजावलेल्या जवानांना  वेगवेगळे न ठेवता आणि सर्व जवानांची एकाच कक्षात विलगीकरण करण्यात आल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. आज घडीला १९४ राज्य राखीव जवान पैकी तब्बल ८३ जणांना लागण झाली असल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे.


In Hingoli, 14 more State Reserve personnel were infected, the total number of patients has gone up to 89 .....
Another shocking news for the district is that on Monday, on the same day, the medical reports of 23 jawans of the state reserve police force were positive for corona.  Today, the number of corona patients in Hingoli district has increased to 89 due to an increase of 14.

 According to a report by the general hospital administration on Monday, 23 new SRPF personnel were infected with corona.  These jawans were on patrol in Mumbai.  A nurse treating corona patients was also infected.  According to yesterday's statistics, the number of districts was 76.  So today it has been added again.  Today, the reports of 14 jawans of the State Reserve Police Force have come positive.  Therefore, now the total number of patients in Hingoli district is 90.  As one patient was discharged, the total number of patients in the district has gone up to 89.  It is noteworthy that except for 6 patients, all the other patients are jawans of State Reserve Police Force.  These jawans have performed their duties during the Corona curfew at Malegaon, Mumbai.  As a result, these soldiers have also contracted corona.  When he came to Hingoli on duty, the district administration immediately shifted him to the separation room.  However, the administration has not kept the personnel on duty in Mumbai and Malegaon separate and all the personnel have been segregated in the same cell, which has infected them to a large extent.  As many as 83 out of 194 state reserve personnel have been infected so far and the situation has become critical.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या