स्पेस-एक्सच्या यशस्वी प्रेक्षेपणात आमचाही सिंहाचा वाटा


बाला राममूर्ती यांच्यामुळे भारतीयांची छाती अभिमानाने फुगली....

डीएम रिपोर्ट्स- ३० मे रोजी एलन मस्क या खाजगी व्यावसायिक कंपनीचे स्पेस-एक्स हे यान नासाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन अवकाशात यशस्वीपणे प्रेक्षेपित झाले असून हे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर उतरणार आहे. फाल्कन-९ या रॉकेटच्या साहाय्याने यशस्वीरित्या प्रक्षेपित झालेले हे पहिले व्यावसायीक यान असून ही मोहीम यशस्वी झाली असल्याने आता अंतराळात व्यावसायिक यान पाठवून भविष्यात अंतराळ पर्यटन करण्याचा मार्गही सुकर झाला आहे. या ऐतिहासिक मोहिमेत ज्या शास्त्रज्ञांनी योगदान दिले आहे, त्यात जन्माने भारतीय असलेले बाला राममूर्ती यांनी सिंहाचा वाटा उचलला असून त्यांच्या कामामुळे प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानाने फुगली आहे.

बाला राममूर्ती
 अंतराळात यान पाठविणारी ही पहिली व्यावसायिक कंपनी ठरली आहे. बॉब बेहेनकेन आणि डग हर्ले या दोन अंतराळवीरांना घेऊन हे यान सुखरूपपणे आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राकडे झेपावले गेले. हा ऐतिहासिक क्षण जगभरातील करोडो लोकांनी पहिला असून, या यानाच्या यशस्वीतेत आमचे काही योगदान आहे का? हा प्रश्न निर्माण झाल्यास होय हेच उत्तर मिळणार आहे.
स्पेस-एक्स
यापूर्वीही अनेक अंतराळ मोहिमांमध्ये कल्पना चावला, सुनीता विलियम्स सारख्या अनेक भारतीय शास्त्रज्ञ आणि अंतराळवीरांनी आपल्या कर्तृत्वाचा अमित ठसा उमटविला आहे. आता या मोहिमेत बाला राममूर्ती यांचे नाव चर्चेत आले असून ते केनेडीच्या लाँच कंट्रोल सेंटरमधील फायरिंग रूम ४ आणि स्पेस-एक्स क्रू ऑपरेशन्स अँड रिसोर्स इंजिनियर (सीओआरई) चे मुख्य अभियंता आहेत.  बाला राममूर्ती हे मूळचे चेन्नईचे असून त्यांनी अण्णा विद्यापीठातून अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आणि गेल्या ९ वर्षांपासून ते स्पेस-एक्समध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. राममूर्ती यांच्या लिंक्डइन या सामाजिक माध्यम खात्यावरून ते स्पेस-एक्सच्या बिल्ड अँड फ्लाईट रिलायबिलिटीचे सदस्य आहेत आहेत. हे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या