आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

डीएम रिपोर्ट्स-  संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करीत आणि कोणतीही पूर्व परवानगी न घेताच सार्वजनिक कामाचे उद्घाटन केल्याप्रकरणी अपक्ष आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध अमरावती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अमरावती मधील बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून संचारबंदी लागू असताना शासनाची कुठल्याही परवानगी न घेता अमरावती शहरातील राजापेठ येथील रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपूलाचे शनिवारी उद्घाटन त्यांनी केले होते.  याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापेठ पोलिस स्टेशनचे  एपीआय गजानन मेहेत्रे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. या कार्यक्रमाला  आमदार रवी राणा यांनी ऑटो रिक्षा आणि १५ ते २० कार्यकर्ते जमा केले होते. त्यामुळे रवी राणा यांच्यासह कार्यकर्ते आणि ऑटोरिक्षाचालकांविरुद्ध शनिवारी रात्री आपत्ती व्यवस्थापन कायदा उल्लंघन केल्याप्रकरणी भादंवि कलम १८८, २६९ आणि संचारबंदी, साथरोग कायद्याच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने