तबलीग प्रकरणात केवळ सनातनी हिंदूंना खुश करण्यासाठी मुस्लिमांवर करवाई - ' वंचित'चे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांची रोखठोक भूमिका

भाजपला महाराष्ट्रात सत्ता हवी, जनतेचे काही देणे घेणे नाही....

डीएम रिपोर्ट्स- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद शहरात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे स्वागत करण्यासाठी  नमस्ते ट्रंप कार्यक्रमात लाखों लोक एकञ जमविले. त्यात ५ हजार अमेरीकन्स सुद्धा आले होते आणि त्यानंतर भारतात करोनाचा प्रसार झाला, असे सांगतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी, दिल्लीतील तबलिग प्रकरणात केवळ सनातन हिंदूंना खुश करण्यासाठी मुस्लिम धर्मांच्या लोकांवर कारवाई करण्यात आली असल्याचा रोखठोक आरोपही त्यांनी केला.

एका सामाजिक माध्यम वृत्तवाहिनीशी बोलताना बाळासाहेब आंबेडकर पुढे म्हणाले की ,  मी कोरोना पूर्वीही भित नव्हतो. आताही भित नाही. जनतेनेही कोरोनाला भिवू नये. फक्त योग्य काळजी घ्या. सोशल डिस्टन्सिंगच्या नावाखाली घरातील व्यक्तींना दुरावलो आहोत. कोरोनाची भीती असली तरी; आता मात्र समाजातील व्यक्तींना भेटून त्यांना सहानुभूती, आपुलकी दाखवण्याची गरज असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले. सरकारने व मिडीयाने जनतेला कोरोनाची भिती दाखवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. तबलीगींबाबत बोलताना, आंबेडकर म्हणाले की, दिल्लीत तबलीगींच्या काॅनफरन्सला विदेशातून असंख्य विदेशी प्रतिनिधी आलेत. ते येणार आहेत हे सर्व नरेंद्र मोदीजीना माहित होते. विदेशी एंबशी कडून तबलीगींचे व्हीसा मोदीजीने थांबविले असते तर कोरोना  दिल्लीत पसरला नसता. त्यांनी दुर्लक्ष केले. नंतर सनातन हिंदूना खूष करण्यासाठी तबलीगींवर गुन्हे दाखल केलेत, असा रोखठोक आरोप त्यांनी केला. 

कोरोना रोगाचा सेंटरपाॅंईट भारतातील मोठी शहरे ठरली आहेत. ही परिस्थिती उद्भवल्यास साठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हीच जबाबदार असून त्यांनी विदेशात कोरोना रोगाची साथ पसरलेली आहे, हे माहिती असतानाही कोणतीही पूर्वखबरदारी घेतली नाही. मुंबईतील भविष्यातील रोजगार आणि नोकरी संदर्भात बोलताना बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, मुंबईत वर्किंग टाईमटेबलमध्ये बदल करावा. म्हणजे गर्दी होणार नाही. आणि जे लोक घरूनच काम करू शकतात त्यांना ३ महिने घरूनच काम करू द्यावे. त्यांनी प्रवास करण्याच्या भानडगडीत पडू नये. ज्यांची कामासाठी फिजिकल उपस्थिती आवश्यक आहे त्यांनाच मुंबईत प्रवासाची परवानगी द्या. सरकारच्या वतीने याबाबत उचित पावले उचलणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारने डाॅक्टर्स, नर्सेस, स्वच्छता कर्मचारी आणि संबंधित कर्मचारी यांना स्वरक्षणाची सर्व उपकरणे व साधन सामुग्री पुरेशा प्रमाणात प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. सरकारने सामान्य जनतेला मोफत व पर्याप्त प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी. टेस्टिंग, बेड्स,आयसीयु बेड्स, व्हेंटीलेटर्स, औषधे, आवश्यक उपकरणे, ऑक्सिजन सिलेंडर्स, रुग्णवाहिका आदी सुविधा सर्व हाॅस्पिटलमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिल्यास या आजारापासून भीती न निर्माण होता, त्याला तोंड देणे शक्य होईल असेही त्यांनी नमूद केले. 

भाजप नेते मुंबईत राज्यपालांची भेट सतत घेत आहेत. त्यांच्या भेटी जनतेसाठी व कोरोना रोगाला रोखण्यासाठी नाहीत. तर राज्य सरकार विरूध्द षडयंत्र करून सरकार पाडण्यासाठी आहेत. सरकार मधील काही लोकांची त्यांना साथ आहे, असा सणसणीत तर्कसुद्धा त्यांनी काढला. भाजप सत्तेसाठी राजकारण करीत असून त्यांना जनतेचे काही देणे घेणे नाही, असेही त्यांनी नमूद केले. लाॅकडाऊन मुळे लोकांचा डायट संपूर्णपणे बदलला. एरवी जनतेचा फिरण्याने जो व्यायाम व्हायचा तो बंद झाला. बीपी, शूगर अन्य आजार असलेल्या लोकांना डाॅक्टर्स हात लावत नाहीत. तपासत नाहीत. कोरोना टेस्ट करून या असे सांगतात. त्यामुळे जनतेचे मनोबल खचत असून नागरिक अनेक दिवसांपासून घरात कोंडून असल्याने त्यांच्यावर मानसिक परिणाम होत आहे.

या साथ रोगामुळे विशेषतः श्रमिकांची विदारक स्थिती सरकारने केली असून या श्रमिक घटकांना सरकारने लाचार केले आहे. सरकारच्या चुकीच्या नितिमुळे देशात आर्थिक व सामाजिक प्रश्न निर्माण झाले असून भविष्यात हे आणखी गंभीर स्थिती निर्माण होईल असा इशाराही त्यांनी दिला.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने