मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या कडून बाबासाहेबांना आदरांजली....
Democrat MAHARASHTRA
हिंगोली- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या ट्विटर करून अभिवादन केले. राज ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील ऋणानुबंध आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीला त्यांनी उजाळा दिला.
याबाबत राज ठाकरे यांनी एक फोटो प्रसिद्ध करून त्या फोटोमध्ये हा संपूर्ण मजकूर लिहिला आहे. त्यात म्हटले आहे की, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्ष गुलामगिरीच्या खाईत लोटलेल्यांचं पुनरुत्थान तर केलंच पण सोबतच शिक्षण, अंधश्रद्धा, स्त्रियांची स्थिती, अर्थकारण या आत्यंतिक महत्त्वाच्या विषयांच देखील त्यांना पूर्ण भान होतं. तसंच माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या फक्त एका आवाहनानंतर त्यांनी मांडलेली भूमिका संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी शक्तिवर्धक ठरली. महाराष्ट्राच्या बंडखोरी मराठी प्रवृत्तीच्या ह्या महामानवास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन.'
Tags:
#ambedkarJayanti
#BhimJayanti
#MaharashtraNavNirmanSena
#MNS
#PrabodhankarThackrey
#RajThackrey