Democrat MAHARASHTRA
हिंगोली- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 25 मार्चला देशभरात लॉकडाउन लागू करण्याची घोषणा केली होती. हा लोकंडाऊन उद्या म्हणजेच 14 एप्रिल रोजी संपणार आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता देशातील 5 राज्यांमध्ये 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन यापूर्वीच वाढविण्यात आला आहे. तर उद्या प्रधानमंत्री लॉकडाऊन बाबत कोणता मोठा निर्णय घेतात याकडे लक्ष लागले.
शनिवारी प्रधानमंत्री मोदी यांनी मुख्यमंत्र्यांसोबत केलेल्या चर्चेनंतर आणि कोरोना रुग्णांची संख्या पाहता देशातील पंजाब, ओडिशा, तेलंगाना, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील लॉकडाउन संबंधित मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच 30 एप्रिलपर्यंत वाढला आहे. तर केंद्रीय उद्योग मंत्रालयाने 15 प्रकारचे उद्योग आणि फळे आणि भाज्यांना लॉकडाऊनमध्ये सूट देण्याची शिफारस केळीला आहे. याबाबत रविवारीच उद्योग व वाणिज्य मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये 15 प्रकारचे उद्योग सुरु करणे आणि फळे-भाज्यांची विक्री करणाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे याबाबतही उद्या काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे. तर सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि क्रीडासंबंधीत कार्यक्रमांवर बंदी कायम राहण्याची दाट शक्यता आहे. कारण या कार्यक्रमांमुळे मोठ्या प्रमाणावर लोक एकमेकांच्या संपर्कात येतात आणि त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. अशीच स्थिती चित्रपटगृहे, मॉल्स, पार्क, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, शाळा-महाविद्यालये यांचीही असल्याने हे देखील बंद ठेवण्याबाबत निर्णय होऊ शकतो.
पहा कशी आहे रेल्वेची तयारी
देशातील काही ठराविक मार्गांवर रेल्वे गाड्या सुरू होऊ शकतात. या गाड्या एकदाच नव्हे तर टप्याटप्याने सुरु होऊ शकतात. ज्यांना प्रवास करायचा आहे. त्यांना किमान चार तास रेल्वे स्थानकावर पोहचावे लागणार असून या काळात प्रवाशांची प्रत्येक स्टेशनवर प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग, तपासणी करून त्यांना सॅनिटायझरद्वारे निर्जंतुकीकरण करण्याचा विचार आहे. सोशल डिस्टन्सचा विचार करता केवळ निम्म्या जागांवर आरक्षण दिले जाईल. म्हणजेच एका खुर्चीवर एकाच प्रवाशाला बसता येईल. मुंबई, पुणे सारख्या कोरोना संक्रमणाच्या हॉटस्पॉटवर गाड्या थांबणार नाहीत. फक्त रिझर्वेशन तिकीट असणारेच स्टेशनवर जाऊ शकतील आणि गर्दी टाळण्यासाठी, प्लॅटफॉर्मची तिकिटे न देण्याचा विचार आहे.
देशाचे तीन झोन तयार करण्याची कल्पना
कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार, रेड झोन : हॉटस्पॉट असणारे जिल्हे, जेथे आधीपासून सर्वकाही बंद आहे. ऑरेंज झोन : ज्या जिल्ह्यांमध्ये नवीन रुग्ण मिळाले नाहीत, जुने रुग्णांची संख्या कमी आहे आणि ग्रीन झोन : संक्रमण मुक्त जिल्हे. यानुसार ग्रीन झोन आणि ऑरेंज जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनला सूट दिली जाऊ शकते. तसेच या जिल्ह्यांमध्ये विमानसेवा सुरु करण्याचाही निर्णय होऊ शकतो.
|
0 टिप्पण्या
We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe