आपआपल्या घरातच भीमजयंती साजरी करा- भंते धम्मशिल यांचे आवाहन

Democrat MAHARASHTRA
हिंगोली- कोरोना विषाणू  चा फैलाव होवु नये म्हणुन सरकारने Lock down केले आहे.त्यामुळे यावर्षी ची भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती ही सार्वजनिक स्वरुपात म्हणजेच एका ठिकाणी मिळुन मिरवणूक काढण्यास सरकारने परवानगी नाकारली आहे.त्यामुळे यंदाची भीम जयंती ही नाचुन नव्हे तर डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि बुध्दाचे विचार वाचुन साजरी करण्याचा संकल्प सर्वांनी करावा असे आवाहन येथील भंते धम्मशिल यांनी केले आहे.
भंते धम्मशिल यांनी भीम जयंती साजरी करण्याबाबत केलेले निर्देश खालील प्रमाणे आहेत.
निर्देश
१) १४ एप्रिल रोजी कुणीही घराबाहेर पडु नये.गर्दी करु नये.समाज मंदीरात अथवा विहारात मोठ्या संख्येने हजर राहु नये.social distance १० फुटांचे ठेवावे.कोरोना हा गर्दी त पसरत असतो.याची दखल सर्वांनी घ्यावी.

२) आपल्या परिसरात बुध्द विहारात व सामाजीक सभागृहात बौध्दाचार्य किंवा जबाबदार व्यक्ती बुध्द वंदना घ्यावी.ध्वज पताका फडकावी.विहारात गर्दी कुणीही करु नये.आपल्या घरातच विहारात वंदना चालु होताच आपल्या ही कुंटुंबासमवेत आपण सामुहीक कौटुंबिक वंदना घ्यावी.

३) घरांची रंगरंगोटी करावी.घरात विद्युत रोषणाई करावी.ध्वज उभा करावा.घरी बुध्द व भिम गीतांचा गजर करावा.अंगणात रांगोळी टाकावी.सायंकाळी सर्वांना आनंदोत्सव म्हणुन दिवे लावुन घराचा परिसर दैदिप्यमान करावा.

४) घरात बुध्द व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे स्वतंत्र अधिष्ठान तयार करावे.सुंदर सुसज्ज पध्दतीने सजावट करावी.whats app वर ते प्रसारीत करावे.

५) भीमजयंतीच्या निमित्ताने समाजातील व आपल्या सर्व मित्र परिवाराला इतर समाजातील लोकांना शुभेच्छा संदेश Social Media द्वारे ध्यावेत.वैचारिक संदेश पाठवावेत.

६) आपल्या घरात सर्वांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषणे विचार १८ तासासाठी वाचन करावेत.अशा प्रकारचे वंदन आपल्या उध्दारकर्त्यास अपेक्षित होते.

७) दरवर्षी आपण भीम जयंतीस वर्गणी देत असतो.परंतु या वर्षी गोरगरिब बेघर लोकांना जीवनवश्यक वस्तु देण्यासाठी वर्गणीच्या माध्यमातून मदत करावी.
                (भंते धम्मशिल)
८) कुणीही घराबाहेर येवु नका.वारंवार हात स्वच्छ करा.तोंडाला रुमाल किंवा मास्क बांधा.अनोळखी व्यक्ती च्या संपर्कात येवु नका.कपडे गरम पाण्याने स्वच्छ करा.social distance राखा.सरकारने दिलेल्या सुचनांचे व नियमांचे पालन करा.सर्वांप्रति मंगलमैत्री ठेवा.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने