50 bed isolation ward in Vasmat for Covid-19 patients वसमत येथे 50 खाटांचे विलगीकरण कक्ष

डेमोक्रॅट महाराष्ट्र / वसमत- 
येथे परभणी रोडवर ५० बेडचे  सुसज्ज असे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले असल्याची माहिती तालुका टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली.
कोरोनाचा प्रतिबंध आणि उपाययोजना संदर्भात हिंगोली जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क राहून काम करीत आहे. हिंगोली जिल्ह्यात कुणाचा एक रुग्ण आढळल्याने आणि हा रुग्ण वसमत उपविभागातील असल्यामुळे ही योजना करण्यात आली आहे. हा रुग्ण वसमत तालुक्यातील कोरोनाग्रस्त किंवा संशयितांच्या संपर्कात आलेल्यांना तपासणीअंती शहरातील लोकांपासुन दूर ठेवण्यासाठी परभणी रोडवरिल अल्पसंख्यांक मुलींचे वस्तिगृह रिकामे करून तेथे 50 बेडची व्यवस्था असलेले भव्य क्वारेनटाईन प्लेस उभारण्यात आले आहे. 24 तास सुरु राहणा-या कक्षाची  जबाबदारी वसमत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक 
चिलकेवर, तालुका आरोग्य अधिकारी सुनील देशमुख, महिला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक चव्हाण या डॉक्टरसह 15 वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथक नेमण्यात आले आहे. न.प.मुख्याधिकारी अशोक साबळे, तहसील विभागाचे मंडळ अधिकारी पी.आर काळे, सुरेश बोबडे हे प्रशासना कडून काम पाहणार आहेत. नुकतेच हिंगोलीच्या आरोग्य पथकाने सदर जागेची पाहणी केली असून हो जागा सज्ज असल्याची माहिती प्रवीण फुलारी यांनी दिली आहे.
After one patient of covid-19 found in in Hingoli district the administration have triggered its preparation to for the isolation of the suspected  and confirmed patients. In  this move the  isolation ward of 50 beds  have been established by the the Vasmat sub -divisional administration. the one patient found of coronavirus is from Vasmat  city and that's why the administration have made this preparation.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने