हिंगोलीत संचारबंदी दरम्यान पत्रकार आणि पोलीस निरीक्षकात हाणामारी / Scuffle between police officer and journalist in hingoli

डेमोक्रॅट महाराष्ट्र न्यूज ब्युरो/हिंगोली- 
शहरातील गांधी चौकात आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास संचारबंदी असताना झालेल्या वादात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर आणि न्यूज१८ लोकमत टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी कन्हैय्या खंडेलवाल या दोघांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत कन्हैया खंडेलवाल आणि ओमकांत चिंचोलकर दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना हिंगोली येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत आयबीएन लोकमत टीव्हीचे कन्हैया खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार ते वार्तांकन करण्यासाठी गांधी चौकात उभी असताना वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी, ते पत्रकार आहेत की नाही याची चौकशी करण्यापूर्वी त्यांना मारहाण करणे सुरू केले. तसेच कानशिलात पिस्तूल रोखून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप खंडेलवाल यांनी केला आहे. 
Summary in English-
Scuffle between police officer and journalist in hingoli. In the incident police inspector of hingoli city traffic deptt. Omkant chincholkar and journalist of News18- Lokmat TV Kanhaiya Khandelwal have sustained serious injuries in the incident. both the police officer and a journalist have levelled allegations against each other both are admitted in hingoli civil hospital.
यानंतर काही पोलिस कर्मचाऱ्यांनी खंडेलवाल यांना मोठ्याप्रमाणावर मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले असून ते सध्या सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर ओमकांत चिंचोलकर सुद्धा सामान्य रुग्णालयात दाखल झाले असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संचारबंदी दरम्यान, कन्हैय्या खंडेलवाल हे गांधी चौकात आले आणि म्हणाले की तुम्ही आमच्या गल्लीतील मुलांना का रोखत आहात. मी न्यूज१८ लोकमतचा पत्रकार आहे, चिल्लर माणूस नाही. असे म्हणून खंडेलवाल व त्यांच्यासोबत आलेल्या तरुणांनी चिंचोलकर व पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात चिंचोलकर यांना डोक्यात गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे हिंगोली शहरात कर्फ्यू दरम्यान पोलीस आणि नागरिकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. पत्रकारावर झालेल्या या हल्ल्याचा हिंगोली जिल्ह्यात पत्रकार संघटनांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत असून संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी पोलिसांना लेखी आदेश देवून सामान्य माणसांना मारहाण करू नये, तसे झाल्यास पोलिस अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल असे असा इशारा दिला आहे. या घटनेत खंडेलवाल हे पत्रकार असल्याचे घटनास्थळी असलेल्या बहुतांश सर्वच पोलिसांना माहिती होते. असे असतानाही त्यांना मारहाण झाल्याने पत्रकार संघटना संतापल्या आहेत. असे असले तरी घटनास्थळी असलेले  सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई कारवाई होणे गरजेचेेे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या