कोरोना विरुद्धच्या लढ्यात २ महिन्यांचे वेतन देणारे रामदास आठवले पहिले मंत्री; पीएम केयर फंडासाठीही दिले १ कोटी


Union Minister of State, Ramdas Athawale


Democrat MAHARASHTRA
News Bureau/Hingoli - कोरोना विरुद्धचा  लढा लढण्यासाठी  पी एम केयर फंडात मदत करण्याचे जाहीर आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे तसेच राज्यसभेचे उपसभापती उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्यसभेचे खासदार म्हणून आपल्या  खासदार निधीतून १ कोटींचा निधी पीएम केयर फंडात  आणि २ महिन्यांचे वेतन महाराष्ट्राच्या  मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देत असल्याची  घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज केली आहे.

कोरोना विरुद्धचा लढा यशस्वी करण्यासाठी जनतेने जनता कर्फ्यु यशस्वी केला पाहिजे. घरीच राहून कोरोनाचा मुकाबला केला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनानुसार आपल्याला जमेल तेव्हढी रक्कम पी एम केयर फंडात  मदत म्हणून जमा करावी. कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करण्यासाठी आर्थिक मदती ची गरज लागणार आहे. त्यामुळे आपण खासदार निधीतून १ कोटी पीएम रिलीफ फंडात आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दोन महिन्यांच्या  वेतनाचे  ४ लाख रुपये देत असल्याचे आज ना. रामदास आठवले यांनी जाहीर केले. कोरोना विरुद्ध च्या लढ्याला यशस्वी करण्यासाठी लॉकडाऊनच्या  पंतप्रधानांच्या अवहनाला आपण घरीच राहून यशस्वी केले पाहिजे. याकाळात अडचणीत आलेल्या हातावर पोट असणाऱ्या मजुरांना जमेल तिथे भोजन व्यवस्था सामाजिक संस्थांनी केली पाहिजे. यात रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. सोमवार दि. ३० मार्च पासून बांद्रा येथील संविधान निवासस्थानाजवळ दररोज १०० गरजूंना भोजनदान करण्यात येणार असल्याचे ना. रामदास आठवलेसाहेब यांनी आज जाहीर केले.  कोरोना विरुद्ध च्या लढाईला यशस्वी करण्यासाठी आज च्या बिकट स्थितीत तरुणांनी रक्तदान करण्याची गरज आहे. रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे आले पाहिजे असे आवाहन रामदास आठवले यांनी  आज केले.  कुरूना विरुद्धच्या लढ्यामध्ये स्थानिक विकास निधीतून अनेक  खासदार आणि आमदारांनी मदत केली आहे. परंतु प्रत्यक्ष आपल्या स्वतःच्या वेतनातून आणि तेही तब्बल दोन महिन्यांचे वेतन देणारे आणि कोणताही गाजावाजा न करणारे रामदास आठवले हे एकमेव मंत्री ठरले आहेत.  Ramdas Athwale is the first minister to contribute not only from local development funds but also he has contributed his salary of 2 months i.e. 4 lac rupees. Hence he has become the first minister to contribute his salary of 2 months for the war against corona.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने